साराला करायचाय ‘कुछ कुछ होता है’ चा...

साराला करायचाय ‘कुछ कुछ होता है’ चा रिमेक… (Sara Ali Khan Wants To Star In Kuch Kuch Hota Hai Remake)

सारा अली खाननं बॉलीवूडमध्ये पदार्पणापासूनच आपलं नाव कमावण्यास सुरुवात केली. तिचं दिसणं, तिचा अभिनय, नृत्य अशा एकंदरीत सर्वच गोष्टींवर तिचे चाहते फिदा आहेत. २०२० मध्ये कार्तिक आर्यनसोबत आलेला तिचा ‘लव्ह आज कल २’ हा सिनेमा फारसा चालला नसला तरी त्यातली सारा मात्र भाव खाऊन गेली. ‘अतरंगी रे’ आणि ‘कुली नं वन’ हे तिचे दोन सिनेमे ओटीटी वर प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांनी फारशी कमाल दाखवली नसली तरी या सिनेमातील गाण्यांवर थिरकलेली सारा सर्वांनाच अधिक भावली. आता तिला कुछ कुछ होता है या चित्रपटात काम करायचे आहे. या लोकप्रिय चित्रपटाचा रिमेक व्हावा अशी इच्छा तिने एका माध्यमाशी बोलताना व्यक्त केली.

1998 मध्ये रिलीज झालेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं. करण जोहर लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाने तरुणांनाच नाही तर सर्वांनाच भुरळ घातली. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. धर्मा प्रॉडक्शन निर्मित ‘कुछ कुछ होता है’चे शूटिंग भारत, स्कॉटलंड आणि मॉरिशसमध्ये झाले होते. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटात अनुपम खेर, फरीदा जलाल, रीमा लागू, अर्चना पूरण सिंग, हिमानी शिवपुरी, जॉनी लीव्हर, नीलम कोठारी, सना सईद, परजान दस्तूर अशा अनेक दिग्गजांनी भूमिका पार पडल्या आहेत. एका माध्यमाने सारा अली खानची मुलाखत घेतली. यावेळी तिला जुन्या चित्रपटांबाबत विचारण्यात आले.

त्यावेळी सारा म्हणाली, मी, जान्हवी कपूर आणि विजय देवरकोंडा आम्हा तिघांना एकत्र कुछ कुछ होता है मध्ये काम करायचं आहे. करण जोहरने जर आम्हाला घेऊन याच चित्रपटाचा रिमेक केला तर खूप चांगलं होईल. किंबहुना ही संकल्पना तुम्ही आताच करणच्या कानावर घाला. मला 98.3 टक्के खात्री आहे की ते हे मान्य करतील. त्यामुळे, मला वाटते की हा चित्रपट आम्हीच केला पाहिजे.”

(Video Credit – Pinkvilla)