दिल्लीच्या कडक थंडीत सारा अली खानचा टाइमपास; आध...
दिल्लीच्या कडक थंडीत सारा अली खानचा टाइमपास; आधी गेली गुरूद्वारात नंतर जान्हवी कपूरला चिडवत कुल्फीचा आस्वाद (Sara Ali Khan Visits Bangla Sahib Gurudwara And Enjoys Kulfi With Janhvi Kapoor)

सारा अली खान सध्या तिची आई अमृता सिंह आणि जान्हवी कपूरसोबत दिल्लीच्या कडक थंडीची मजा घेत आहे. तेथील फोटो ती आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहे. सारा आणि जान्हवी दिल्लीमध्ये आपल्या अतरंगी रे या चित्रपटाचं प्रमोशनसाठी गेल्या असून त्यांच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शकही आहेत.

साराने आपल्या आईसोबत दिल्ली येथील बंगला साहिब गुरुद्वाराचे आधी दर्शन घेतले आणि त्यानंतर जान्हवी कपूरला चिडवत कुल्फीचा आस्वाद घेताना ती दिसली.

साराने तिच्या इंस्टा स्टोरी वर दिल्ली दर्शनाची स्टोरी शेअर केली आहे. सारा ने गुरुद्वारात जाण्यासाठी पांढऱ्या रंगाचा लखनवी ड्रेस घातला आहे आणि त्यावर गुलाबी ओढणी घेतली आहे, तर अमृताने गोल्डन ब्राउन सूट घातला आहे. विशेष म्हणजे दोघींनी मास्क घातला आहे.


दुसऱ्या स्टोरीमध्ये सारा जान्हवीला चिडवत कुल्फी खाताना दिसत आहे आणि जान्हवी तिच्यावर लाडीकपणे रागावून तोंड वाकडे करून राहिली आहे. जान्हवीने ब्राउन कलरचा ड्रेस घातला आहे. दोघी इंडिया गेटवर मजा करताना दिसताहेत.

नंतर सारा डायनिंग टेबलवर निकटवर्तीयांसोबत बसलेली दिसतेय. साराने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय – माझे चकाचक कुटुंब कारण खाणे हे सगळ्यात मोठे साजरीकरण आहे.
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम