सारा अली खानने घेतले आसमच्या ‘कामाख्या देवी’चे ...

सारा अली खानने घेतले आसमच्या ‘कामाख्या देवी’चे दर्शन (Sara Ali Khan Visits Assam’s Kamakhya Temple, Shares Photos From Her Trip)

सतत सोशल मीडियावर सक्रीय असणारी सारा अली खान या वीकेंडला देवदर्शनासाठी गुवाहाटी येथील ‘कामाख्या देवी’ च्या मंदिरात गेली होती. आपल्या या सहलीचे सुंदर फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान रविवारी हिंदूचे पवित्र स्थान असलेल्या गुवाहाटी (आसाम) येथील कामाख्या देवीच्या मंदिरात गेली होती. साराने तेथील यात्रेचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रविवारी आपल्या सर्व कामांतून सुट्टी घेऊन सारा कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेली होती. पांढरा ड्रेस घातलेली सारा या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

सारा अली खान पोहोचली कामाख्या देवीच्या मंदिरात

सारा अली खान, मनःशांति आणि आशिर्वचनासाठी धार्मिक स्थळांची भटकंती करू लागली आहे. रविवारी तिने आसम येथील कामाख्या देवीच्या मंदिराची निवड केली. पांढऱ्या रंगाची सलवार-कुर्ती आणि गळ्यात पारंपरिक आसामी गामोसा (पटका) तिने घातला होता.

मंदिराची यात्रा करते वेळीचे काही फोटो तिने आपल्या इंन्स्टाग्राम स्टोरीमध्ये प्रदर्शित केले असून हे फोटो पोस्ट करत एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “#शांति  #आभार #आशीर्वाद”. आसमचे हे कामाख्या मंदिर गुवाहाटीच्या नीलाचल डोगंरामध्ये वसलेलं आहे आणि अलिकडेच पर्यटकांसाठी हे पुन्हा खूले करण्यात आले आहे. साराचा हा साधा आणि डिसेंट लूक चाहत्यांना वेड लावत आहे. तर काही युजर्सनी तिला यावरून भयंकर ट्रोल देखील केलं आहे.

काही युजर्सनी तिची प्रशंसा केली आहे. तर काहींनी तिचा आसामी लूक पाहून ‘वेलकम टू आसम’ असं म्हटलं आहे. एक यूजर लिहितो, “मुसलमान असून हिंदू देवतेची पूजा करतेस? कमाल आहे.’’ एका यूजर ने ‘मॅडम तुमचा धर्म कोणता आहे?’ असं विचारलंय तर एकाने तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम? असा सवाल केला आहे.

युजर्सच्या ट्रोलिंगला सामोरे जाण्याची ही साराची पहिली वेळ नाहीये. या आधीही सारा आपली अम्मी अमृता सिंगसोबत काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी बनारसला गेली होती. तेथे मंदिरात साराने आपल्या आईसोबत पूजाअर्चा केली असतानाही तिला ट्रोल व्हावे लागले होते.

तिच्या आगामी कामाबाबत सांगायचं तर सारा सध्या आसामला आपल्या ‘वीर गनी’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी गेली आहे. या व्यतिरिक्त ‘वीरांगना’ मध्येही सारा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. आपल्या शूटिंगमधून वेळ काढून तिने कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.