महाशिवरात्रीच्या दिवशी कपाळाला टिळा लावून मंदिर...

महाशिवरात्रीच्या दिवशी कपाळाला टिळा लावून मंदिरात पूजा करताना दिसली सारा अली खान, काहींनी केले ट्रोल तर काहींनी केले कौतुक (Sara Ali Khan Trolled For Worshipping Lord Shiva On Mahashivratri)

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली सारा अली खान पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. सारा अली खान महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर भगवान शंकराची पूजा करण्यासाठी मंदिरात गेली होती. पारंपारिक पोशाख परिधान करून महादेवाची पूजा करतानाचे फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यापासून सारा अली खान सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आली आहे.

सारा अली खान महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्यासाठी मंदिरात गेली होती. पिवळा सूट परिधान करून सारा भोलेनाथाच्या मंदिरात बसलेली पाहायला मिळाली. फोटोत तिच्या पाठी भगवान शंकराची मूर्ती दिसत आहे. दुसर्‍या फोटोत साराने गळ्यात जय भीमाशंकर नावाची ओढणी घातली आहे आणि शिवमंदिरात हात जोडून बसली आहे.

या दोन फोटोंशिवाय साराने आणखी अनेक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती भगवान शंकराच्या मंदिरासमोर पोज देताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन लिहिले की- जय भोलेनाथ! यासोबतच ओमसोबत एक इमोजीही शेअर केला आहे.

अभिनेत्रीने हे फोटो पोस्ट केल्यानंतर, तिच्या चाहत्यांना ते खूप आवडले, परंतु काही लोकांना साराचे हे फोटो अतिशय संतापजनक वाटले आणि त्यांनी सोशल मीडियावर ट्रोल सुरुवात केली. काही लोकांनी साराला प्रश्न केला आहे की तू इस्लामचे पालन करते का? काहींनी साराला नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे. एका ट्रोलरने तर अभिनेत्रीला जहन्नमी औरत म्हटले आहे. ज्याचा उर्दूमध्ये अर्थ नरकात जाणारी स्त्री असा होतो.

कमेंट करताना एका युजरने म्हटले की, साराने मुस्लिम असल्याने मझिदमध्ये जावे, नमाज अदा करावी, येथे येऊ नये. आणखी एकाने उपहासात्मक लिहिलं आहे की अशा लोकांना लाज वाटली पाहिजे, हेच लोक मुस्लिमांचे नाव बदनाम करतात.

साराच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर तिचा बचाव केला आहे. हे फोटो पाहून ते अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. ट्रोलरच्या या कमेंटवर आपली प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने ती मुस्लिम असून हिंदूही असल्याचे म्हटले आहे.