ओटीटी प्ले अवॉर्ड्समध्ये सारा अली खान ते कार्ति...

ओटीटी प्ले अवॉर्ड्समध्ये सारा अली खान ते कार्तिक आर्यन पर्यंत अनेक बड्या स्टार्सनी लावला जबरदस्त ग्लॅमरचा तडका; पण सी-थ्रू ब्लॅक गाउनमधील हिना खान खाऊन गेली भाव… (Sara Ali Khan To Kartik Aaryan… Bollywood Stars Add Glamour To The OTT Play Awards 2022, But Hina Khan Steals The Show With Her See-Through Black Gown…)

मनोरंजन विश्वातील सर्वात मोठा ओटीटी प्ले अवॉर्ड्स (OTT Play Awards) हा कार्यक्रम मुंबईत (Mumbai) पार पडला. हा पहिला पॅन इंडिया ओटीटी अवॉर्ड्स सोहळा आहे. शनिवारी संध्याकाळी, रेड कार्पेट कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), सारा अली खान, तापसी पन्नू, विद्या बालन यांच्यासह ग्लॅमर जगतातील अनेक स्टार्सनी सजले होते.

कार्तिक आर्यन सूट-बूटमध्ये धमाल दिसत होता, तर कोंकणाने साडीने सर्वांना आकर्षित केले. सोनेरी-पिवळ्या ऑफ-शोल्डर मिनी ड्रेसमध्ये सारा अली खान अतिशय सुंदर दिसत होती. या चमकदार बॉडीकॉन ड्रेसमध्ये अभिनेत्रीने जबरदस्त पोझ दिल्या… पण या कार्यक्रमातील सर्वात लक्षवेधी गोष्ट ठरली हिना खानचा अतिशय स्टायलिश लूक. हिना इतकी हॉट दिसत होती की बघणाऱ्यांची तिच्यावरुन नजर हटत नव्हती. हिनाचा लूक सर्वच मोठ्या स्टार्सवर भारी पडला.

या कार्यक्रमासाठी हिनाने ब्लॅक सी-थ्रू थाई हाय स्लिट गाऊन परिधान केला होता. या पारदर्शक गाऊनमधून हिनाची हॉट फिगर डोकावत होती. हा फुल स्लीव्ह गाऊन पूर्णपणे पारदर्शक होता आणि आत अभिनेत्रीने फिटेड ब्रॅलेट टॉप आणि शॉर्ट कट आउट बॉटम घातले होते. हिनाचा मेकअप आणि अॅक्सेसरीज तिच्या लूकला पूरक ठरले, पण हिनाच्या आउटफिट व्यतिरिक्त, आकर्षणाचे केंद्र बनलेली दुसरी गोष्ट म्हणजे हिनाची हेअरस्टाइल, जी खरोखरच ग्लॅमरस आणि वेगळी होती. हिनाने तिच्या इन्स्टा पेजवर या लूकचे फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शन दिली आहे – हे कसे केले जाते ते मी तुम्हाला दाखवते…

अभिनेत्रीच्या स्टाईलचे व्हिडिओ आणि फोटो खूप व्हायरल होत आहेत आणि चाहते असेही म्हणत आहेत की हिनाला स्टायलिश कसे असावे हे माहित आहे, तर काही लोक तिला तिच्या लूकवर ट्रोल करत आहेत आणि म्हणत आहेत की ही स्टाईल हिनाला शोभते असे नाही, पण हेही खरे आहे की, आज सगळीकडे हिनाच्या स्टाईल आणि लूकची चर्चा आहे आणि चाहत्यांची मनं कशी जिंकावी हे हिनाकडून शिकावं, असं सगळ्यांचं म्हणणं आहे.