‘माझा एक्स आता सगळ्यांचा एक्स आहे’ असं म्हणत सा...

‘माझा एक्स आता सगळ्यांचा एक्स आहे’ असं म्हणत साराने केला तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल खळबळजनक खुलासा (Sara Ali Khan Takes A Dig At Ex Boyfriend, Says- My Ex Is Everyone’s Ex)

करण जोहरचा बहुचर्चित शो कॉफी विथ करणचा ७ वा सीजन सुरु होत आहे. हा शो ७ जुलैपासून ओटीटी प्लेटफॉर्म डिज्नी प्लस हॉट स्टारवर पाहायला मिळणार आहे. या शो ची घोषणा झाल्यापासून लोक खूप उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या शो चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. ट्रेलर पाहून तरी या सीजनमध्ये जबरदस्त गॉसिप्स ऐकायला मिळणार असल्याचे समजते.  ‘कॉफी विथ करण 7’मध्ये अभिनेत्री सारा अली खानने तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल असे काही सांगितले की ते ऐकून स्वत: करण जोहर सुद्धा आश्चर्यचकित झाला.

ट्रेलरवरुन या सीजनमध्ये सारा येणार असल्याचे दिसते. साराने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. तिच्या प्रेमप्रकरणांबद्दल कॉफी विथ करण मध्ये गप्पा मारण्यात आल्या. त्या गप्पांमध्ये साराने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल काही गोष्टी सांगून करणची बोलती बंद केली आहे.

शो च्या प्रोमोमध्ये सारा तिची जवळची मैत्रिण जान्हवी कपूरसोबत आल्याचे दिसते. त्यावेळी करणने त्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल काही प्रश्न विचारले. करणने जेव्हा साराला विचारले की तुझा एक्स , एक्स का आहे ? त्यावेळी साराने करणला मजेशीर उत्तर देत म्हटले की कारण तो आता सगळ्यांचा एक्स आहे. आता या उत्तरातून साराने कोणाच्या नावाचा इशारा केला हे सगळ्यांना समजले आहे.

काही वर्षांपूर्वी सारा जेव्हा करणच्या शो मध्ये आलेली तेव्हा करणने तिला सध्याचा क्रश कोण असे विचारले होते तेव्हा साराने क्षणाचाही विलंब न करता अभिनेता कार्तिक आर्यनचे नाव घेतले होते. त्यानंतर सारा आणि कार्तिकने लव आजकल २ या चित्रपटात एकत्र काम केले. त्यावेळी दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघे अनेकदा एकत्र पार्टी आणि कार्यक्रमांना पाहिले गेले होते. पण नंतर अचानक त्यांचा ब्रेकअप झाला. काही दिवसांपूर्वी दोघांना पुन्हा एकत्र एका कार्यक्रमात पाहिले गेले पण तेव्हा ते एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न करत होते.