शाळेच्या गणवेशातील फोटोत सारा अली खानला शोधा...

शाळेच्या गणवेशातील फोटोत सारा अली खानला शोधा… (Sara Ali Khan Shares Unseen Photo From Her School Days, Asks Fans To ‘Find Her?’)

बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार किड सारा अली खान नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. बरेचदा ती, स्वतःचे तसेच फॅमिलीसोबतचे फोटो इंटरनेटवर प्रदर्शित करत असते. आता तिने तिच्या लहानपणीचे शाळेतील दिवसांचे याआधी न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अन्‌ काही मिनिटांत साराच्या या फोटोंनी इंटरनेटवर कमाल केली आहे. या फोटोंतून तिला शोधून काढण्याचं, सारानं चाहत्यांना आव्हानही केलं आहे.

सारा अली खानने इन्स्टाग्रामवर आपल्या शाळेतील दिवसांचे काही जुने आणि न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. ‘इन्स्टाग्रामपासून फेसबूकपर्यंत’ साऱ्याच्या या दुर्मिळ आणि न पाहिलेल्या फोटोंनी काही मिनिटांत इंटरनेटवर जादू घडवून आणली आहे.

सारा अली खान शाळेत जात असतानाचा तिचा, तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबतचा हा ग्रूप फोटो आहे. या फोटोतील छोटी सारा देखील अतिशय क्यूट दिसत आहे. शाळेचा ड्रेस घातलेल्या आणि चेहऱ्यावर निरागस हास्य असलेल्या साराला पाहताच कोणीही तिच्या प्रेमात पडेल.

या फोटोमध्ये सारा आणि तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सफेद रंगाचा गणवेश घातलेला आहे. त्यांच्या टीशर्टवर ‘बीएमएस’ असं छापलेलं आहे. तिने आपल्या फोटोला स्टिकर्स, डान्सिंग गर्ल आणि पॉप अप स्टिकर लावून सजवलं आहे. सारा शाळेतील पायऱ्यांवर बसलेली दिसत आहे. आपल्या लहानपणीच्या आठवणींत रमलेल्या साराने ‘मला शोधा’ असं चाहत्यांना सांगितले आहे. या फोटोत सारा आपले वर्गसवंगडी आणि शिक्षकांसोबत खाली उजवीकडे बसलेली दिसतेय.

काही दिवसांपूर्वीच सारा अली खानच्या आत्येने तिच्या बालपणीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंवर तिने चाहत्यांसाठी पर्याय दिला होता ‘स्वीट की नॉटी’.

साराचं शालेय शिक्षण मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती युएसला गेली होती. अभिनेत्री अनन्या पांडे ही देखील साराच्याच शाळेत शिकली असून ती साराला सीनियर होती.