सारा अली खानने नवा बॉयफ्रेंड गाठला की काय? दोघा...

सारा अली खानने नवा बॉयफ्रेंड गाठला की काय? दोघांचे रोमॅन्टिक फोटो झालेत व्हायरल… (Sara Ali Khan Shares Romantic Pictures With Rumoured Boyfriend Jehan Handa, See Viral Photos)

सारा अली खानचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साराने ज्या व्यक्तीसोबत हे फोटो काढले आहेत, त्यावरून काय समजायचं? सारा अली खानने नवा बॉयफ्रेंड गाठला की काय?

सारा अली खानने नुकतेच ‘केदारनाथ’ या आपल्या पहिल्या चित्रपटाचा सहाय्यक संचालक जेहन हांडासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर अगदी वेगाने व्हायरल होत आहेत. सोबत या दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजत असल्याची अफवाही पसरत आहे. या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे, पाहूया.

सारा अली खानचं कोणाबरोबर नाव जोडलं जाणं, ही गोष्ट नवीन नाही. याआधीही तिच्यासोबत काम करणाऱ्या सह-कलाकारांसोबत तिचं नाव जोडलं गेलं आहे. परंतु, साराने आपल्या रिलेशनशिपच्या बाबत कधी कोणती कमेंट केली नाही. साराच्या पहिल्या चित्रपटातील हिरो सुशांत सिंह राजपूत ते कार्तिक आर्यनपर्यंत अनेकांशी तिचं नाव जोडलं गेलं आहे. मागील काही दिवस ‘केदारनाथ’ चित्रपटाचा सहाय्यक संचालक जेहन हांडासोबतचे साराचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यापासून या दोघांमधील अफेअरच्या चर्चा झडू लागल्या आहेत.

सारा अली खान आणि जेहन हांडा यांच्यामध्ये खास बॉन्डिंग असल्याचं या फोटोंमधून स्पष्टच दिसत आहे. विशेष म्हणजे जेहन हांडा याने सारा अली खान सोबतचा आपला फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केल्यामुळे, त्यांच्यातील अफेअरच्या चर्चेला चांगलाच ऊत आला आहे. साराने देखील हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि तिने फोटोवरील कॅप्शनमध्ये ‘लव यू’ आणि ‘मला परत घेऊन चल’ असं लिहिलंय. या फोटोंत दोघांनी ऑरेंज कलरचे आउटफिट घातले असून दोघांनी हे फोटो सुट्टीमध्ये काढलेले दिसताहेत. दोघांचंही या फोटोंमधील बॉन्डिंग पाहून कोणालाही दोघांमध्ये नक्कीच काहीतरी चाललंय, असंच वाटेल.

मागच्या वर्षी २०२० मध्ये १२ ऑगस्टला साराच्या वाढदिवशी जेहनने सारासोबतचा आपला व्हिडिओ आणि फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यात त्याने लिहिलं होतं की – ”आपलं प्रेम, मैत्री आणि त्या दिवसांच्या आठवणीं व्यतिरिक्त काही नाही, ज्या आपण काही वर्षांपासून सजविल्या आहे. प्रेम, सण, चांगले-वाईट दिवस, नुकसान, महामारी… या दरम्यान आपण तरुणपणीच्या भावनांतून उत्पन्न होणाऱ्या संकटांतून आणि चढउतारातून गेलो आहोत, तरीही एकमेकांना घट्ट पकडून आहोत. आभारी आहे आणि मी नेहमीच तुझं कौतुक करण्याचं वचन देतो.” हा व्हिडिओ आणि फोटोंमधील दोघांचं बॉन्डिंग खूपच सालस वाटत आहे.

तुम्हाला काय वाटतं, सारा अली खानच्या आयुष्यात खरंच बॉयफ्रेंड आला आहे का? की ही फक्त त्यांच्यामधील निखळ मैत्री आहे?