सारा अली खानने बिकिनी घालून मालदीवचे समुद्रतट क...

सारा अली खानने बिकिनी घालून मालदीवचे समुद्रतट केले नारिंगी! (Sara Ali Khan Shares Hot Orange Bikini Pictures From Maldives, Gets Her Dose Of Vitamin Sea)

सारी अली खान जे काही करते वा घालते त्याची बातमी होते. तिने साधं सलवार-कमीज घातलं वा हॉट बिकिनी घालून आपली टोंड बॉडी दाखवली, तरी कोणत्याही वेशामध्ये तिचे सौंदर्य लपून राहत नाही.
हल्लीच सारा राजस्थानच्या सहलीसाठी गेली होती आणि तेथील अतिशय सुंदर फोटो तिने शेअर केले होते. फेब्रुवारीमध्ये ती आपला भाऊ इब्राहिम आणि आई अमृतासोबत मालदीवमध्ये सुट्टीची मजा घेत होती आणि आत्ताही साराने मालदीवमधील एक अतिशय सुंदर आणि तितकाच हॉट फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो फोटो पाहिल्यानंतर तिच्या फॅन्सनी असं म्हटलंय – कहा कहीं कोई कमी नहीं, आप हो सबसे हसीन!
अर्थात सौंदर्याच्या मापदंडात सारा अली खान अगदी परफेक्ट असल्याचं फॅन्सनी सांगितलं आहे.

साराने या फोटोमध्ये नारिंगी बिकिनी घातली आहे आणि ती समुद्रकिनारी लाटांची मजा घेत आहे. साराने एक मेजशीर कॅप्शनही दिली आहे – व्हिटामिन सीचा डेली डोस, साराने हॅश टॅगमध्ये ‘व्हिटामिन c आणि व्हिटामिन sea’ असंही लिहिलं आहे… एवढंच नाही तर व्हिटॅमिन सी सोबत नारिंगी रंगाचे ईमोजीही बनवले आहेत. साराने आपल्या नारिंगी रंगाच्या बिकिनीसोबत स्मायली कनेक्ट केल्या आहेत आणि व्हिटॅमिन सी सोबत समुद्राचा ईमोजी टाकला आहे. हे सगळं पाहता साराला मजेशीर गोष्टी करायला आवडतात असं दिसतं.
सारा ने आपल्या इंस्टा स्टोरीवर देखील हे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे क्यूट फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.
फॅन्सही तिच्या फोटोंची भरभरून प्रशंसा करत आहेत.

यापूर्वीचे साराचे जयपूर येथील पारंपरिक लूकमधील फोटोही चाहत्यांना अतिशय आवडले होते.

Photo Courtesy: Instagram (All Photos)