ब्लू अँड व्हाइट बिकिनीतील सारा अली खानचे मालदीव...

ब्लू अँड व्हाइट बिकिनीतील सारा अली खानचे मालदीवच्या सुट्टीचे फोटो व्हायरल (Sara Ali Khan Shares A Video From Her Maldives Trip, Actress Flaunts Sexy Figure In Blue And White Bikini)

सगळ्यांची आवडती स्टार किड सारा अली खान आपल्या बिझी रुटीनमधून ब्रेक घेऊन मालदीवला सुट्टी घालवायला गेली आहे. तेथील फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या चाहत्यांना पाठवत असते. साराचे मालदीव बेटावरचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

सैफ अली खान आणि अमृता सिंहच्या या लेकीने पहिल्याच चित्रपटापासून दर्शकांवर आपली छाप कायम केली आहे. सध्या ती बॉलिवूडमधील हॉटेस्ट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Sara Ali Khan, Maldives Trip, Sexy Figure, Bikini

२६ वर्षीय साराने इन्स्टाग्रामवर मालदीव बेटावरील हॉट आणि सेक्सी फोटो टाकून सोशल मीडियावर आग लावली आहे. फोटोंसोबत तिने एक व्हिडिओही शेअर केला आहे ज्यात ती फारच सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये साराने निळ्या आणि पांढऱ्या रंगाची प्रिंटेड बिकिनी घातली असून ती स्विमिंग पुलच्या किनारी उभी आहे. सारा सूर्यास्ताच्या वेळेचे विहंगम दृश्य न्याहाळत आहे.

साराने शेअर केलेल्या व्हिडिओला तिने “तू महासागराचा एक थेंब नाहीस, तू एका थेंबात संपूर्ण महासागर आहेस – रुमी” अशी कॅप्शन लिहिली आहे.

Sara Ali Khan, Maldives Trip, Sexy Figure, Bikini

तिच्या या फोटोंची चाहत्यांकडून बरीच तारीफ केली जात आहे. तू अतिशय सुंदर आहेस, तू परी आहेस, लव्ह यू सारा, खूपच सुंदर माय गर्ल… अशा शब्दांत चाहते तिची प्रशंसा करत आहेत.

Sara Ali Khan, Maldives Trip, Sexy Figure, Bikini

या आधी साराने ऑरेंज आणि पिंक कलरच्या बिकिनीमधील तिचे फोटो शेअर केले होते. आणि कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की,”तुम्ही मनापासून आकाश शेअर करू शकता.”

या सहलीदरम्यानचे साराचे वेगवेगळ्या अंदाजातील सगळेच फोटो चर्चिले जात आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम