लडाखच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत असलेली सार...

लडाखच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत असलेली सारा अली खानची छायाचित्रे (Sara Ali Khan Shares A Beautiful View Of Ladakh, See Pictures)

निसर्गाच्या सान्निध्यात मनुष्यास सुख, शांती आणि समाधान अनुभवता येते. असाच काहीसा अनुभव घेण्यासाठी सारा अली खान आपल्या मैत्रिणीसोबत लडाखला पोहोचली आहे. तेथून ती आपले अनुभव व तेथील आनंदी क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कधी ती ध्यानस्त बसलेली दिसतेय, तर कधी निसर्गाचा आनंद घेताना दिसतेय. कधी ती सायकल चालवत आहे तर कधी चहा पिण्याची मजा घेतानाही दिसत आहे.

Sara Ali Khan,  Ladakh
Sara Ali Khan,  Ladakh

सारा अली खानला भटकंतीची विशेष आवड आहे, परंतु अलिकडे ती आध्यात्मिक होत असलेली दिसत आहे. काही फोटोंमध्ये सारा मंदिरात ध्यान लावून बसलेली दिसत आहे. हे फोटो शेअर करत ‘निसर्ग सुख शांती’, अशा आशयाची कॅप्शन साराने दिली आहे. लडाख येथील मंदिरांत जाऊन तेथे भजन-कीर्तन करणाऱ्या स्थानिक लोकांचा तिने व्हिडिओ देखील केला आहे.

Sara Ali Khan,  Ladakh
Sara Ali Khan,  Ladakh

साराची मैत्रिणही तिच्या सोबत या सहलीचा मनसोक्त आनंद लूटत आहे. अनेक हिंदी चित्रपटांतील गाण्यांसोबत हिरवेगार झालेले पर्वत, दऱ्या, वालुकामय रस्ते आणि निसर्गसौंदर्य ती अनुभवत आहे. रोजाचे गाणे ये हसीं वादियां, ये खुला आस्मां…मध्ये ती निसर्गाचं मोहक रूप दर्शवत आहे… नंतर कलाकार चित्रपटातील नीले नीले अंबर पर चांद… गाण्यावर रात्रीचं निळं आकाश… तर अरजीत सिंहचे लाल इश्क आणि इतरही गाण्यांसोबत ती निसर्गाच्या अधिकाधिक जवळ असल्याचा अनुभव घेत आहे. लतादिदींचं लग जा गले की ये हंसी रात हो ना हो…. हे गाणंही ती तन्मयतेने ऐकताना दिसतेय. तिला पाहताना ती जणू गीत, संगीत आणि निसर्ग या तिन्हींच्या अद्‌भूत संगमात स्वतःला हरवून बसलेली दिसत आहे.

सारानं खडाखचं सौंदर्य अतिशय सुंदरतेनं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आहे आणि आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. पाहूया लडाखच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत असलेली सारा अली खानची ही छायाचित्रंतिच्याच नजरेतून…

Sara Ali Khan,  Ladakh
Sara Ali Khan,  Ladakh
Sara Ali Khan,  Ladakh

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम