सारा अली खानची बिकट अट : ही अट जो पाळेल, त्याच्...

सारा अली खानची बिकट अट : ही अट जो पाळेल, त्याच्याशी ती लग्न करणार (Sara Ali Khan Puts A Big Condition : Whoever Agrees Become The Bride Of Actress)

बॉलिवूडमध्ये लहान वयात आणि कमी वेळात आपली ओळख बनवणारी अभिनेत्री म्हणून सारा अली खान सुपरिचित आहे. उत्तम अभिनयासाठी तर ती चाहत्यांची आवडती आहेच पण काही वेळा तिच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ती चर्चेतही राहिली आहे. सारा स्पष्टोक्ती आहे. आपल्या आई-वडिलांच्या नातेसंबंधाबाबत असो वा आपल्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल तिच्या बोलण्यात स्पष्टपणा असतो. नुकतेच तिने आपल्या होणाऱ्या जोडीदाराने कसं असावं यासाठीची अट सांगितली आहे.

Sara Ali Khan, Big Condition, Bride Of Actress

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

सारा सध्या तिच्या ‘अतरंगी रे’ या सिनेमाच्या प्रमोशनमुळे चर्चेत आली आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान साराने तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तिच्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत याबाबत भाष्य केले आहे.

Sara Ali Khan, Big Condition, Bride Of Actress

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

सारा अली खान तिची आई अमृता सिंहच्या बाबत फार हळवी आहे, हे आपण जाणतोच. एका मुलाखतीत साराने आपल्या आईसंबंधीच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यात तिने म्हटले होते की, आईशिवाय ती काहीच करू शकत नाही. आपल्या आउटफिटवर कोणत्या मॅचिंग बांगड्या घालायच्या हे देखील तिला आईने सांगावे लागते. आईने तयार व्हायला मदत केली नाही तर मी मुलाखतीसाठी जाऊ शकत नाही, असेही ती म्हणते.

Sara Ali Khan, Big Condition, Bride Of Actress

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

मुलाखतीत पुढे सारा म्हणते की, आईपासून दूर जाण्याची माझी हिंमत नाही. कुठेही गेले तरी परत घरी यायचे आहे. साराच्या या वक्तव्यावरून तिच्या जीवनात आईचं किती महत्त्व आहे, हे आपल्या लक्षात येतं. आईशिवाय स्वतःच्या आयुष्याची ती कल्पनाही करू शकत नाही.

Sara Ali Khan, Big Condition, Bride Of Actress

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

साराने आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्यानंतर तिला जेव्हा तुला जोडीदार कसा हवा अशा प्रश्न केला गेला तेव्हा तिने म्हटले की माझ्या आईला सोबत राहू देईल अशाच व्यक्तीशी मी लग्न करणार. कारण मी कधी आईला सोडू शकणार नाही. याचाच अर्थ साराला सासरी येऊन राहण्यास तयार होणारा मुलगा हवा आहे.

Sara Ali Khan, Big Condition, Bride Of Actress

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

तसं पाहिलं तर साराबरोबर लग्न करायला कोण तयार होणार नाही, पण घरजावई होण्यास कोण तयार होईल हे वेळच सांगेल. सध्या साराच्या ‘अतरंगी रे’ या सिनेमातील चका चक हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटात तिच्यासोबत धनुष आणि अक्षय कुमार देखील आहेत. चाहत्यांना तिच्या या चित्रपटाची उत्सुकता आहे.