चाहत्यांचे होश उडवणारा साराचा बोल्ड अन् मादक लू...

चाहत्यांचे होश उडवणारा साराचा बोल्ड अन् मादक लूक (Sara Ali Khan looks sizzling hot in see-through dress, shares photos on Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नुकतीच स्टाईल आयकॉन अवार्ड्स (STYLE ICONS AWARDS) मध्ये स्पॉट केली गेली. या कार्यक्रमात एका सुंदर ब्लॅक कोमा ड्रेसमधील साराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

ब्लॅक आणि व्हाईट रंगसंगतीच्या या ड्रेसमधून साराची संपू्र्ण फिगर दिसत होती. या गाऊनमधील तिच्या मादक अदांनी सर्वांनाच मोहून टाकले.

साराचा हा सुंदर ड्रेस अमी पटेल यांच्या कलेक्शन मधला आहे. डेव्हिड कोमा डिझायनींग ब्रॅन्डचा हा ड्रेस जरी बोल्डनेसच्या सर्व सीमा ओलांडत असला तरी साराला हा ड्रेस खूप शोभून दिसत आहे. या सुंदर ड्रेससाठी साराने नॅचरल लूक ठेवला आहे. देवाश्री या मेकअप आर्टिस्टने साराचा न्यूड मेकअप केला आहे. तिच्या लिपस्टिकपासून फाउंडेशनपर्यंत सर्वांमध्ये न्यूड मेकअप करण्यात आला आहे. यावेळी साराने केस मोकळे सोडले आहे.

या सुंदर ड्रेसमधून सारा तिची सुंदर कंबर फ्लॉन्ट करताना दिसली. या सुंदर ड्रेसवर साराने कोणत्याही प्रकारची ज्वेलेरी आणि अ‍ॅक्सेसरी घातल्या नव्हत्या. साराच्या या ड्रेसला कंबरेला जॉईन्ट देण्यात आला आहे. या ड्रेसमधून सारा तिची सेक्सी फिगर दाखवताना दिसत आहे.

साराच्या या स्टाईल लूकबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. चाहते ट्विटरवर #SaraAliKhan या नावाने ट्रेंड चालवत आहेत. चाहत्यांना साराच्या या पारदर्शक काळ्या ड्रेसमधील सौंदर्यानं घायाळ केलं आहे. चाहते तिच्या या पोस्टवर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)