सारा अली खानने मोठ्या अम्मी शर्मिला टागोर यांना...

सारा अली खानने मोठ्या अम्मी शर्मिला टागोर यांना दिल्या जन्मदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा… (Sara Ali Khan- … Inshallah I Hope That I Can Always Make You Proud…)

गालात मस्त खळी पडणारी अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील बोल्ड ॲण्ड ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून शर्मिलाजी ओळखल्या जातात. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नातीने अर्थात सारा अली खानने आपल्या अम्मासाठी एक सुंदर पोस्ट लिहिली आहे.

जन्मदिवस, शर्मिला टागोर, sharmila tagore, birthday

साराने पोस्टमध्ये लिहिलंय – हॅपिएस्ट बर्थडे बड़ी अम्मी 🤗🤗 आय लव यू सो मच… माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. आम्हा सगळ्यांचा भक्कम आधार होऊन राहिल्याबद्दल धन्यवाद. असं ती म्हणाली. तसेच त्यांना नेहमी अभिमान वाटावा असेच ती वागणार असल्याचे तिने सांगितले.

जन्मदिवस, शर्मिला टागोर, sharmila tagore, birthday

साराने तिच्या इन्स्टास्टोरीवर शर्मिलाजींना मिठी मारतानाचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांच्या ‘आराधना’ या सुपरहिट चित्रपटातील गुनगुना रहे हैं भंवरे… हे गाणे प्ले करत – हॅपी बर्थ डे फ्रॉम रील लाइफ रिंकू टू रियल लाइफ रिंकू 💕💕💕 लव यू बड़ी अम्मा #बॉसलेडी… असे म्हटले आहे.

जन्मदिवस, शर्मिला टागोर, sharmila tagore, birthday

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गुनगुना रहे हैं… या गाण्याने चांगलीच वातावरण निर्मिती केली असून दोघींचा फोटोही खूप गोड दिसत आहे.

शर्मिला टागोर यांच्याबद्दल सांगायचं तर, त्यांनी सत्यजीत रे यांच्या ‘अपूर संसार’ या चित्रपटापासून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. परंतु ‘कश्मीर की कली’ या. चित्रपटाने त्यांना खरी ओळख दिली.

शर्मिला टागोर या पहिल्या नटी होत्या ज्यांनी चित्रपटामध्ये बिकिनी घातली आणि लोकांनाही त्यांचा अंदाज आवडला. इन इव्हीनिंग इन पॅरिस या चित्रपटातील त्यांचा बिकीनी शॉट बराच गाजला.

जन्मदिवस, शर्मिला टागोर, sharmila tagore, birthday

या संदर्भात एक मजेशीर किस्सा असा आहे की, त्यावेळेस भारतीय क्रिकेट संघाचे कप्तान मंसूर अली खान पतौडी यांच्यासोबत शर्मिलाजींचं प्रेमप्रकरण सुरू होतं. दरम्यान पतौडी यांची आई मुंबईत येणार असल्याचे शर्मिलाजींना कळलं. ते कळल्याबरोबर त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना सांगून शहरात जिथे कुठे तिची बोल्ड पोस्टर्स लावलेली होती, ती काढायला सांगितली होती. कारण त्यांना भिती वाटत होती, की आपल्या होणाऱ्या सासूने जर अशा बोल्ड अवतारात तिला पाहिलं असतं तर त्यांचं लग्न मोडलं असतं….. शर्मिलाजींचा गालावर खळी पाडणारा हसरा चेहरा पाहिला की प्रसन्न वाटतं. त्यांची नात सारा अली खान देखील तितकीच गोड चेहऱ्याची असून तिनेही कमी वेळात आपलं करिअर उंचावलं आहे.

जन्मदिवस, शर्मिला टागोर, sharmila tagore, birthday

शर्मिला टागोर यांना त्यांची सून व सैफ अली खान यांची पत्नी करीनाने देखील एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून  ‘हैप्पी बर्थडे टू माय ब्यूटीफुल मदर इन लॉ… आयकॉनिक.. असे म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.