सारा अली खान भाऊ इब्राहिमवर प्रेम व्यक्त करून झ...

सारा अली खान भाऊ इब्राहिमवर प्रेम व्यक्त करून झाली भावुक (Sara Ali Khan – Home Is Where The Brother Is)

सारा अली खानचे आपल्या कुटुंबियांशी घट्ट नाते आहे. विशेषतः आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम यांच्याबद्दल तिला खूप जिव्हाळा आहे. शूटिंग संपवून ती नुकतीच काश्मीरच्या निसर्गरम्य परिसरात सहलीला गेली आहे. तिथून आपला भाऊ इब्राहिम आणि मित्र-मैत्रिणींबरोबर मौजमस्ती करतानाचे फोटो तिने शेअर केले आहेत.

आपल्या भावाबाबत भावुक होऊन सारा लिहिते – जिथे भाऊ असतो, ते घर असतं. इब्राहिम हा आपले पिताजी सैफ अली खानची कार्बन कॉपी आहे. इब्राहिम सोबत ती नेहमीच हिंडत असते. आता बर्फाने नटलेल्या काश्मीरमध्ये ती त्याला घेऊनच कडाक्याच्या थंडीचा आनंद घेते आहे. बर्फामध्ये इब्राहिम स्केटिंग करत असल्याचे फोटो व व्हिडीओ साराने शेअर केले आहेत. विकी कौशल बरोबर साराचा एक चित्रपट तयार होत आहे. त्यांचं शूटिंग इंदूरला आटोपून ती काश्मीरमध्ये पोहचली आहे. विकी कौशलची तिनं वारेमाप स्तुती केली आहे.

Photo Courtesy: Instagram