बिकिनी घालून स्पॉट गर्लला स्विमींग पूलमध्ये ढकल...

बिकिनी घालून स्पॉट गर्लला स्विमींग पूलमध्ये ढकलून देणाऱ्या सारा अली खानवर लोकांची तीव्र नाराजी (Sara Ali Khan Gets Brutally Trolled For Pushing Her Spot Girl Into Pool)

सारा अली खानने केलेली एक मस्करी तिला भारी पडली आहे. लोक तिच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. या संदर्भात जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे, त्यात स्पष्ट दिसत आहे की, टवाळखोर सारा आधी आल्या स्पॉट गर्लसोबत, पोज देते आहे. नंतर ध्यानीमनी नसताना त्या मुलीला पोहण्याच्या तलावात ढकलून देते. अन्‌ मग स्वतःही पाण्यात उडी मारून तिची मस्करी करते आहे.

या व्हिडिओत साराने अंग प्रदर्शन करणारी पांढरी बिकिनी घातली आहे. तिच्या या अचानक केलेल्या मस्करीने बिचारी स्पॉट गर्ल घाबरलेली आहे.  असं काही घडेल, याची तिला कल्पनाही नसेल.

हा व्हिडिओ साराने ठरवून केला असावा. कारण तिने तो इन्स्टा स्टोरीवर प्रसिद्ध केला आहे. ‘ही तुझ्या जिंदगीतील सर्वात वाईट मस्करी आहे,’ असे युजर्सनी सांगितल्यावर तिने तशी कबुली दिली आहे.

मात्र हा व्हिडिओ पाहून लोक जाम भडकले आहेत. ‘ही मस्करी नाही, वाह्यातपणा आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ‘यात काय गंमत आहे?’ असे सांगत या कृत्यामुळे त्या स्पॉट गर्लला इजा झाली असती, किंवा आणखी काही वाईट घडलं असतं – असे कमेन्टस्‌ आले आहेत.

ट्वीटर ते इन्स्टाग्रॅम वर लोक साराला खडे बोल सुनावत असून हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/ट्वीटर