पिंक हॉट पॅण्ट आणि व्हाईट क्रॉप टॉपमध्ये सारा अ...

पिंक हॉट पॅण्ट आणि व्हाईट क्रॉप टॉपमध्ये सारा अली खानने केले अॅब्सचे प्रदर्शन (Sara Ali Khan Flaunts Her Perfectly Toned Abs In Pink Hot Pant And White Crop Top,Watch)

सारा अली खान ही एक अशी अभिनेत्री आहे जिच्यामध्ये इगो किंवा ती सेलिब्रेटी असल्याचा अॅटिट्यूड जराही नाही. तिची हीच गोष्ट तिच्या चाहत्यांना फार आवडते. ती कितीही मोठी सेलिब्रेटी किंवा स्टारकिड असली तरी तिचे पाय अजुनही जमिनीवरच आहेत. पॅप्सच्या समोरही ती अगदी सहज पोज देत असते.

सध्या साराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात ती खूप फ्रेश, सडपातळ आणि तंदुरुस्त दिसत आहे. सारा पिंक हॉट पॅण्ट, व्हाईट क्रॉप टॉप घालून ओले केस सावरत बाहेर पडली. त्यावेळी बाहेर मीडियावाले तिची वाटच बघत होते.

नो मेकअप लूकमध्ये सुद्धा सारा खूप फ्रेश वाटत होती. पण यावेळी तिच्या चाहत्यांची नजर तिच्या चेहऱ्यावर नाही तर तिच्या स्लिम बॉडी आणि अॅब्सवर गेली. तिचे अॅब्स खूपच आकर्षक वाटत होते. तिचा फिटनेस पाहून तिचे चाहते हैराण झाले.

तिच्या काही चाहत्यांचं म्हणणं आहे की, सारा हल्ली जास्तच बारीक झाली असून तिच्या जागी आम्ही असतो तर आमची आई बोलली असती की, थोडं खा , पोटं एकदमच सपाट दिसतयं. तर काहीजण म्हणतात की, सारा आणखी वजन कमी करत आहे. कोण म्हणेल की हिचे वजन पूर्वी 90 किलो होते.

साराने तिचा लूक तिच्या पिंक स्लिप ऑन्सने पूर्ण केलेला दिसतो. कारमध्ये बसताना तिचा चष्मा नीट करताना ती फारच लोभस दिसते . सारा तिच्या परफेक्ट बॉडी शेप आणि अॅब्स दाखवताना खूपच खूश दिसत आहे.