मालदीव मधील समुद्रकिनारी पाहा सारा अली खानच्या ...

मालदीव मधील समुद्रकिनारी पाहा सारा अली खानच्या दिलखेच अदा, अभिनेत्रीचे फोटोज होताहेत व्हायरल (Sara Ali Khan you Enjoying Vacation in Maldives, Hot Photos Goes Viral on Internet)

अतिशय कमी वेळात आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी सारा अली खान ही सतत सोशल मिडियावर ऍक्टिव्ह असते. वेळोवेळी आपले फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिचे चाहतेही तिच्या फोटोंची आतूरतेने वाट पाहत असतात. म्हणूनच मालदीवला सुट्टीची मजा घेण्याकरिता गेलेल्या साराने आपले काही हॉट फोटोज्‌ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. चाहत्यांनीही तिच्या या फोटोंना पसंती दर्शविली असून तिचे हे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत असताना सारा अली खानने जे फोटो पोस्ट केले आहेत, त्या फोटोंमध्ये ती निरनिराळ्या रंगांच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या आकर्षक लूकने तिच्या लाखो चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. मालदीवला समुद्रकिनारी वेगवेगळ्या मजेशीर पोज देत साराने क्लिक केलेले हे बोल्ड फोटो जणू काही पाण्यात आग लावत आहेत. चाहत्यांनी साराच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्‌सचा पाऊस पाडून तिच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

साराने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती बिकिनी आणि पॅनिओ मध्ये आपल्या टोन्ड बॉडीवर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. शिवन आणि नरेश या डिझायनर जोडीने डिझाइन केलेले आउटफिट्‌स या फोटोंमध्ये साराने घातलेले आहेत.

वर निळं आकाश आणि खाली विशाल समुद्र अशा निसर्गाच्या सान्निध्यात साराने काढलेले फोटो तिच्या चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करत आहेत. तिने आपले फोटो शेअर करत असं म्हटलं आहे – ‘सँडी टोज अँड सनकिस्ड नोज’ साराने जी बिकिनी आणि पॅनिओ घातला आहे, त्याची किंमत ५२ हजार रुपयांपेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान ही अतिशय कमी वेळात बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. तिने न्यूयॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केलेले आहे.

२५ वर्षीय सारा तिची आई अमृता सिंहची कार्बन कॉपी आहे. तिचं आपल्या आईवर अतिशय प्रेम आहे. हे प्रेम व्यक्त करणारी एक कविता साराने लिहिली होती. या कवितेत तिने आपल्या आईची महती सांगितली आहे.

खरं तर सारा अली खानची जबरदस्त स्टाईल, लुक्स आणि फिटनेसने लाखोंना घायाळ केले आहे. परंतु तिचे जुने फोटो पाहिल्यास चाहते दंग होऊन जातील. ती पूर्वी लठ्ठ होती हे फार कमी लोकांना माहीत आहे.

आज ती जी काही सुंदर आणि सुडौल दिसते, त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. स्वतःला फिट ठेवण्याकरीता तासंनतास तिने जिममध्ये घाम गाळला आहे. तसेच आपल्या आहारावरही तिनं नियंत्रण ठेवलं आहे.

स्वतःच्या फिटनेसबरोबरच तिने आपले आउटफिट्‌स, स्टाइल आणि लुकसाठीही खूप मेहनत घेतली आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा असल्याने तिने स्वतःला आधी फिट बनवले. त्यामुळेच ‘केदारनाथ’ या पहिल्याच चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ती अतिशय लोकप्रिय झाली. तिच्या अभियनयाबरोबरच तिच्या सौर्द्याचीही प्रशंसा झाली.
अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ या पहिल्या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली. त्यानंतर रोहित शेट्टीच्या धर्मा प्रॉडक्शनच्या ‘सिंबा’ या सिनेमामध्ये तिने रणवीर सिंहसोबत काम केले. या व्यतिरिक्त कार्तिक आर्यन सोबत ‘लव आज कल’ आणि वरुण धवनसोबत ‘कुली नंबर वन’ या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.