सारा अली खान झाली सिंड्रेला (Sara Ali Khan Crea...

सारा अली खान झाली सिंड्रेला (Sara Ali Khan Creates Her ‘Cinderella Story’ Through These Dreamy Pictures)

सारा अली खान आपल्या सोशल मीडियावर सतत सक्रीय असते आणि आपले सुंदर फोटो त्यावर शेअर करत असते. एवढंच नाही तर ती आपल्या चाहत्यांना उत्तरही देते. साराने अलीकडेच शूट केलेले तिचे अतिशय सुंदर फोटो ‘सिंड्रेला स्टोरी’ अशा कॅप्शनने शेअर केले आहेत.

एका पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी साराने हा प्रिंसेस लुकवाला स्काय ब्लू गाउन घातला होता. साराला या ड्रेसमध्ये पाहून सर्वजण घायाळ झाले आहेत आणि तिला भरपूर कमेंट्‌स देत आहेत. तिच्या मित्रांनी मजेत तिला, तू भोपळा कधी होणार, असं विचारल्यावर साराने त्यांना मध्यरात्रीनंतर असं उत्तर दिलं आहे.
याआधीही साराने नववधूच्या पोषाखातील स्वतःचे वेगवेगळ्या नखरेल अंदाजातले आणि सुंदर फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना तिनं असं लिहिलं होतं, एखादं स्थळ आहे का एका सुंदर, सुशील आणि सुस्वभावी मुलीसाठी!
साराच्या त्या फोटोंचंही खूप कौतुक झालं आणि या फोटोंतही ती सुंदर परीसारखी दिसत आहे. साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील हे फोटो शेअर केले आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम