‘फुलाला सुगंध’ मध्ये संक्रांतीचा सण...

‘फुलाला सुगंध’ मध्ये संक्रांतीचा सण (Sankranti Celebration in Serial)

नवीन वर्षातील पहिला सण मकरसंक्रांत उद्या आहे. या निमित्ताने ‘फुलाला सुगंध मातीचा’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत संक्रांतीचा सण साजरा होत आहे. या मालिकेची नायिका किर्ती हिची कथानकामध्ये पहिलीच संक्रांत असल्याने काळी साडी, हलव्याचे दागिने अशा सौभाग्यवतीच्या रुपात ती दिसणार आहे.

संक्रांतीचा सण म्हणजे आपापसातले हेवेदावे विसरायला लावणारा दिवस. तिळगुळाच्या गोडीप्रमाणेच नात्यातलाही गोडवा वाढवणाऱ्या या सणाचं आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. तिळगूळ घ्या, गोडगोड बोला, असं म्हणत आपण संक्रांत साजरी करतो. तेव्हा या मुहुर्तावर मालिकेतील किर्ती आणि जिजी अक्का यांच्यात गोडवा निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.