ही उबदार चंद्रकळा… (Sankrant Special – Bl...

ही उबदार चंद्रकळा… (Sankrant Special – Black Warm Dresses)

आरोग्य आणि सौंदर्य या दृष्टिकोनातून वस्त्राचं विशेष महत्त्व असतं. म्हणूनच बहुधा आपण हवामानानुसार वस्त्रांचा वापर करतो. इंग्रजी कालगणनेतील जानेवारी हा थंडीचा महिना. या महिन्यात येणारा महत्त्वाचा सण म्हणजे, मकरसंक्रांत! या दिवशी काळी वस्त्रं घालण्याची प्रथा आहे. कारण काळा रंग बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतो. आज या रंगाची फॅशनच्या दुनियेतली विलोभनियताही प्रशंसनीय आहे.