मोनालिसाने दिल्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा (Sa...

मोनालिसाने दिल्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा (Sankrant Greetings Of Monalisa)

अभिनेत्री मोनालिसाने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खास मराठमोळा साज, दागिने, काळी साडी नेसून तिने फोटोशूट केले आणि प्रकाशित केले.

मोनालिसा आजकाल चांगलीच चर्चेत आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात तिने लक्षवेधी हजेरी लावली होती. तसेच तिचा बोल्ड ऍण्ड ब्युटिफुल लूक देखील चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘करंट’ या मराठी सिनेमाच्या पोस्टरमधील तिचा हा लूक आणि व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मोनालिसाने असे धाडस पूर्वी केले नव्हते. ‘करंट’ हा चित्रपट दिक्षा युवराज सुरवाडे यांची निर्मिती असून दिग्दर्शन अनुप जगदाळे करीत आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात गरमी वाढणार, असं या बोल्ड पोस्टरमध्ये लिहिलं आहे.

मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची योजना आहे. सध्याच्या अनिश्चितीच्या काळात हा आत्मविश्वास कौतुकास्पद आहे.