‘तुम्ही सदैव माझी ताकद, गर्व आणि प्रेरणा ...

‘तुम्ही सदैव माझी ताकद, गर्व आणि प्रेरणा असाल’ – फादर्स डेच्या निमित्ताने संजय दत्तने आपल्या वडिलांबद्दल लिहिली भावुक पोस्ट (Sanjay Dutt remembers dad on Father’s Day: ‘You will always be my great source of strength, pride and inspiration’)

“आपले पिताजी सुनील दत्त यांच्याशी संजय दत्तचे नेहमीच चांगले संबंध राहिले. संजयच्या व्यावसायिक आणि खासगी जीवनात अनेक अडचणी आल्या. पण सुनील दत्त त्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले व त्याला मदत केली. त्यामुळे आज फादर्स डे च्या निमित्ताने संजयने त्यांच्याबद्दल भावुक प्रतिक्रिया दिली आहे.

संजयने आपली मोठी मुलगी त्रिशला व जुळी मुले इकरा व शाहरान यांच्यासह सुनिल दत्त यांचे फोटो शेअर करून लिहिले आहे – ” आय लव्ह यू डॅड. तुम्ही माझ्यासाठी, आम्हा सर्वांसाठी….आपल्या कुटुंबासाठी ज्या काही लहानमोठ्या गोष्टी केल्यात त्याबद्दल आभार!  तुम्ही नेहमीच माझी ताकद, गर्व आणि प्रेरणास्रोत असाल. तुमचा मी मुलगा आहे, हे माझं भाग्यच आहे.”

संजय दत्तने आपल्या मुलांसह फोटो शेअर केले आहेत अन्‌ आपण असेच चांगले माता-पिता होऊ, अशी इच्छा व्यक्त केली आहे. “मी तुमच्यासारखाच वडील होण्याची इच्छा बाळगून आहे. हॅपी फादर्स डे,” असंही संजयने लिहिलं आहे.

संजय दत्त नेहमीच आपल्या वडिलांची आठवण काढत असतो. काही दिवसांपूर्वीच सुनील दत्त यांच्या वाढदिवशी त्याने लिहिले – “तुमचा विश्वास आणि प्रेमाच्या आधारे मी एवढा मोठा झालो आहे. तुम्ही माझे हिरो आहात व राहाल. वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

कामकाजाबद्दल सांगायचं तर संजय दत्त ‘शमशेरा’ मध्ये दिसणार आहे.