‘संजना’चं बदललेलं दिलखेचक रुप : रुपाली भोसलेचा ...

‘संजना’चं बदललेलं दिलखेचक रुप : रुपाली भोसलेचा हा खटाटोप कोणासाठी? (‘Sanjana’ changed Herself And Looks So Charming : Know The Reason Why Rupali Bhosale Changed Her Look)

आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले तिच्या वेगवेगळ्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. रुपालीने हा लूक नेमका कश्यासाठी केला आहे याची तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या फोटोमागचं खरं रहस्य आता समोर आलं आहे.

रुपालीचा हा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यामध्ये. अशी ही बनवाबनवी सिनेमातील हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर रुपाली परफॉर्म करणार आहे. याच परफॉर्मन्साठी रुपालीने सुप्रिया पिळगावकर यांच्या सिनेमातील लुकशी मिळताजुळता लूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

या परफॉर्मन्ससाठी रुपाली अतिशय उत्सुक असून असा हटके प्रयोग तिने पहिल्यांदाच केला आहे. सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधानसोबत रुपाली या सदाबहार गाण्यावर थिरकताना दिसेल.