सना खानच्या घरात हलणार पाळणा, या वर्षी जून महिन...

सना खानच्या घरात हलणार पाळणा, या वर्षी जून महिन्यात होणार नव्या पाहुण्याचे आगमन (Sana Khan pregnant at 34, Actress shares happy news, Will give birth to her first child in June)

बिग बॉस 6 मधून घराघरात लोकप्रिय झालेली बॉलिवूड अभिनेत्री सना खानने बॉलिवूडला कायमचा रामराम केला आणि अनस सैय्यदशी लग्न केले. ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहे. काही काळापूर्वी सना तिच्या पतीसोबत उमराहसाठी गेली होती, तिथून तिने काही फोटो शेअर करून गरोदरपणाचा इशारा दिला होता. आणि आता सनाने या गुड न्यूजला दुजोरा दिला आहे.

सना खानने लग्नाच्या तीन वर्षांनंतर आनंदाची बातमी शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. सना खान लवकरच आई होणार आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला. टीव्ही चॅनल इक्रासोबतच्या संभाषणात सनाचा पती अनस सय्यद याने तो लवकरच पिता होणार असल्याचा खुलासा केला. यानंतर सनानेही पतीच्या बोलण्याला दुजोरा दिला आणि ते दोघेही लवकरच आई-बाबा होणार असल्याचे सांगितले. आनंद व्यक्त करताना सना म्हणाली की, ती मातृत्वाचा आनंद घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. आपल्या बाळाला मिठीत घेण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. ही आनंदाची बातमी समोर आल्यापासून लोक सोशल मीडियावर या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

सना खानने काही वर्षांपूर्वी सिनेसृष्टीला अलविदा केले होते. ग्लॅमर जग सोडून अल्लाहच्या मार्गावर चालायचे असल्याचे सांगितले होते.तिच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला. यानंतर सनाने मौलवी अनस सय्यदसोबत गुपचूप लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता लग्नाच्या तीन वर्षानंतर ते आपल्या पहिल्या अपत्याचं स्वागत करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सना जूनमध्ये बाळाला जन्म देईल. सध्या ती गरोदरपणाचा आनंद घेत आहे.

काही काळापूर्वी सनानेही इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते- “अलहमदुलिल्लाह खूप आनंदी आहे, हा उमराह आमच्यासाठी काही कारणास्तव खूप खास आहे. इन्शाअल्लाह लवकरच आम्ही सर्वांसोबत शेअर करू. अल्लाह हे सोपे करील.” तिच्या या पोस्टनंतरच सना प्रेग्नंट असल्याचा अंदाज लोकांच्या मनात येऊ लागला.