इतक्या वर्षानंतर सलमान खानच्या जखमेवरची खपली नि...

इतक्या वर्षानंतर सलमान खानच्या जखमेवरची खपली निघाली, करीअरच्या सुरुवातीचे दिवस आठवून भावूक झाला अभिनेता (Salman Khan’s Pain Spilled After Many Years, Said – He Was Treated Like This in Early Stage of Career)

बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आणि हँडसम हंक म्हणून सलमान खान प्रसिद्ध आहे. सलमानच्या नुसत्या नावावर चित्रपट चालतात. सलमान खानने आतापर्यंत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. चाहत्यांमध्येही त्याची जबरदस्त क्रेझ निर्माण झाली आहे. यावर्षी सलमान खान ‘गॉडफादर’ या एकाच चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता, पण पुढच्या वर्षी त्याचे दोन चित्रपट बॅक टू बॅक रिलीज होणार आहेत, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्याबद्दल बोलताना सलमानने इतरांची आपल्याशी वागणूक कशी होती ते सांगितले.  

मुलाखतीत, आपल्या यशाचा फंडा शेअर करताना, अभिनेत्याने आपण भाग्यवान असल्याचे देखील सांगितले. तो म्हणाला की, करीअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांमधून मला रिप्लेस केले गेले होते. एवढेच नाही तर हे सर्व माझ्या जवळच्या मित्रांनीच केले होते.

सलमान खान म्हणाला की, माझ्या करीअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात मला वाटायचे की माझे मित्र मला मोठे करतील, पण तो फक्त माझा भ्रम होता, कारण असे काहीही नव्हते. माझ्या मित्रांनी अनेक चित्रपटांमध्ये माझी जागा घेतली होती. सुरुवातीच्या काळात, मला सहजपणे चित्रपटांमधून काढून टाकले जायचे. तेव्हा मला खूप वाईट वाटायचे.

आपल्या चित्रपट कारकिर्दीबद्दल आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रवासाबद्दल बोलताना सलमान खान म्हणाला की मला माझ्या सुरुवातीच्या दिवसात यश मिळू लागले आणि माझे यश पाहून आपल्यासोबत नेहमीच असे घडेल असे मला वाटायचे, परंतु मी जसा विचार केला तसे घडले नाही.

आपल्या वडिलांबद्दल बोलताना अभिनेता म्हणाले की, माझे वडील सलीम खान त्यांच्या काळात खूप चांगले काम करत होते. त्यांचे यश पाहून घरच्यांना वाटले की खूप चांगला काळ चालू आहे आणि कायम असाच चालू राहील, पण नंतर एक वेळ अशी आली जेव्हा माझ्या वडिलांना जवळपास पाच वर्षे बेरोजगार राहावे लागले होते. तेव्हा त्यांच्याकडे काम नव्हते.

सलमान खान मेहनतीला खूप महत्त्व देतो आणि हेच त्याच्या यशाचे रहस्य आहे. याबाबत सलमान म्हणाला की, जर तुम्हाला यश मिळत असेल तर ते हलक्यात घेऊ नका, ते टिकवण्यासाठी मेहनत करत राहा. मेहनत कधीच व्यर्थ जात नाही आणि त्याचे फळ नक्कीच मिळते.

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये त्याचे ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘टायगर 3’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट नवीन वर्षातील ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे, तर ‘टायगर 3’ दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.