स्वतंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाआधीच सलमान खान...

स्वतंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाआधीच सलमान खानने आयएनएस विशाखापट्टणम या लढाऊ नौकेवर नौसैनिकांसोबत तिरंगा झेंडा फडकावला (Salman Khan Waves Flag On Indian Navy’s INS Visakhapatnam Ahead Of India’s 75th Independence Day, See Viral Photos)

सलमान खान त्याच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तरीपण त्याने वेळात वेळ काढून आयएनएस विशाखापट्टणम या सागरी सैनिकांचे काही मनोरंजन केले.

सलमान खानने भारतीय नौसेना जवानांसह एक संपूर्ण दिवस छान घालवला.

या दिवशी त्याने तिरंगा झेंडा फडकावला, सैनिकांसोबत डान्स केला.

त्यांच्यासोबत पुश-अप्सची स्पर्धा केली. इतकेच नव्हे तर सलमानने त्यांच्यासाठी जेवण बनविले.

या सर्व कार्यक्रमांची छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

पांढरा शर्ट आणि ब्लॅक डेनिमची पॅन्ट असा वेष सलमानने केला असून नेव्ही कॅप घातली आहे.

सागरी सैनिकांबरोबर छान वेळ घालविलेले सलमान खानचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. त्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

सलमान खानचा गेल्या वर्षी आलेला चित्रपट होता ‘अंतिम- द फायनल ट्‌रूथ’. या चित्रपटात त्याचे मेहुणे आयुष्य शर्मा यांनी देखील काम केलं होतं.

सध्या त्याचे बरेच चित्रपट निर्माणाधीन अवस्थेत आहेत.

गॉडफादर, कभी ईद कभी दिवाली, किक-२, टायगर-३, अशी त्या चित्रपटांची नावे आहेत.