‘मैने प्यार किया’च्या स्क्रीन टेस्टमध्ये सलमान ...

‘मैने प्यार किया’च्या स्क्रीन टेस्टमध्ये सलमान खान झाला होता नापास… तरी पण पुन्हा त्याला का घेतला, याचा सूरज बडजात्यांनी केला खुलासा (Salman Khan Was Rejected In The Screen Test Of ‘Maine Pyar Kiya’, Sooraj Barjatya Reveals)

बॉलिवूडचे नामांकित निर्माते-दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा ‘उंचाई ११’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सात वर्षानंतर बडजात्यांचा चित्रपट आला आहे.

या चित्रपटाच्या संदर्भात सूरजनी ज्या काही मुलाखती दिल्या त्यात त्यांनी बऱ्याच जुन्या गोष्टींचा खुलासा केला आहे. ते फक्त २१ वर्षांचे असताना त्यांनी ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. पण ती नाकारण्यात आली. त्यावर नाऊमेद न होता, त्यांनी त्यात बऱ्याच सुधारणा केल्या. त्यासाठी २ वर्षे लागली. “आमच्या निर्मिती संस्थेचे काही चित्रपट अपयशी ठरले होते. त्यामुळे आम्ही तणावात होतो,” असे सांगून बडजात्या म्हणाले की, कोणी नट आमच्या चित्रपटात काम करायला तयार होत नव्हते.

“अशा स्थितीत मला एक तरुण भेटला. त्याला खरं तर आम्ही पहिल्या स्क्रीन टेस्टमध्ये नापास केले होते. पण त्याच्यात काहीतरी खास दडलं होतं की, आम्ही त्याला ५ महिन्यांनी याच भूमिकेसाठी पाचारण केलं. तो तरुण म्हणजे सलमान खान!”

सूरज बडजात्या यांच्या वडिलांनी या चित्रपटासाठी कर्ज काढलं होतं. पण आपला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होईल, असा त्यांचा होरा होता, असंही सूरजनी सांगितले अन्‌ तसंच घडलं. ‘मैने प्यार किया’ लोकांना खूप आवडला. सलमान खानच्या करिअरचा तो टर्निंग पॉईंट ठरला.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम