बिग बॉसच्या सूत्रसंचालनासाठी सलमान आधी हे कलाका...

बिग बॉसच्या सूत्रसंचालनासाठी सलमान आधी हे कलाकार होते निर्मात्यांची पसंती (Salman Khan Was Not The First Choice Of The Makers To Host Bigg Boss, These Actors Also Got Offers)

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय शो ‘बिग बॉस’मधील सलमान खानचे सूत्रसंचालन सर्वांनाच आवडते. प्रेक्षक त्यांच्या जागी दुसऱ्या कलाकाराला सूत्रसंचालन करताना पाहूच शकत नाही. सलमान खानच्या दबंग स्टाईलने सर्वांनाच वेड लावले आहे. भाईजानची फी देखील प्रत्येक सीझनसोबत वाढत आहे. बिग बॉसच्या चौथ्या सीझनपासून सलमान खान या शोचे सूत्रसंचालन करत आहे. पण बिग बॉसचे सूत्रसंचालन करण्यासाठी सलमान खान निर्मात्यांची पहिली पसंती नव्हता, त्याच्या आधी निर्मात्यांनी अनेक कलाकारांना ही ऑफर दिली होती.

शाहरुख खान

 बिग बॉसच्या निर्मात्यांनी सर्वप्रथम शाहरुख खानला शोच्या सूत्रसंचालनासाठी संपर्क साधला होता, परंतु कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे शाहरुख खानने ही ऑफर नाकारली.

अक्षय कुमार

 शाहरुख खानने निर्मात्यांची ऑफर नाकारल्यानंतर निर्मात्यांनी  बॉलिवूडच्या खिलाडी कुमारला म्हणजेच अक्षय कुमारला  सूत्रसंचालन करण्याची ऑफर दिली. मात्र अक्षय कुमारनेही बिग बॉसचे सूत्रसंचालन करण्यात रस दाखवला नाही.

सलमान खान

 अक्षय कुमारकडून नकार मिळाल्यानंतर, बिग बॉसच्या निर्मात्यांनी सलमान खानला शो सूत्रसंचालन करण्याची ऑफर दिली आणि सलमान खानने कोणताही विलंब न करता ही ऑफर स्वीकारली आणि तेव्हापासून तो या शोचे सूत्रसंचालन करत आहे.

अर्शद वारसी

 सलमान खान बिग बॉसच्या चौथ्या सीझनपासून शोचे सूत्रसंचालन करत आहे. पण त्याआधी निर्मात्यांनी अनेक जणांना याची ऑफर दिली होती. बिग बॉसचा पहिला सीझन अभिनेता अर्शद वारसीने सूत्रसंचालित केला होता.

शिल्पा शेट्टी

 बिग बॉसचा दुसरा सीझन आला तेव्हा शिल्पा शेट्टीने अर्शद वारसीची जागा घेतली. शिल्पा शेट्टीने बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

अमिताभ बच्चन

 शिल्पा शेट्टीनंतर, अमिताभ बच्चन यांना बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन  करण्याची संधी दिली. पण सीझन 4 मध्ये  बिग बींच्या जागी सलमान खान या शोचा सूत्रसंचालक बनला आणि तो आतापर्यंत या शोचे सूत्रसंचालन करत आहे.