सलमान खान जुही चावलाशी लग्न करणार होता… म...

सलमान खान जुही चावलाशी लग्न करणार होता… मग मोडता कुणी घातला? (Salman Khan Wanted To Marry Juhi Chawla, Because Of This Things Could Not Be Done)

अजूनपर्यंत अविवाहित राहिलेल्या सलमान खानची प्रेमप्रकरणे हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्याच्या प्रेमपात्रांची यादी मोठी आहे. त्याच्या जीवनात एकाहून एक सरस मुलींचा प्रवेश झाला. पण निरनिराळ्या कारणांनी त्यांच्यांशी संबंध तुटत गेले. आता त्याच्या एका अप्रकाशित प्रेमप्रकरणाचा उलगडा झाला आहे. खूप आधी सलमानचा जुही चावलावर जीव जडला होता. तो तिच्याशी लग्न करणार होता… पण फिस्कटलं कुठे? ते ऐका…

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सलमाननेच ही गोष्ट लोकांसमोर मांडली. मागे एकदा आमीर खान व जुही चावला यांच्यासोबत सलमान खान बॉलिवूड कॉन्सर्ट टूरवर गेला होता. त्या दरम्यान त्याला जुही चावला खूप आवडली होती. त्याने जुहीच्या वडिलांकडे तिच्याशी लग्न करण्याची मागणी पण घातली होती…

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

मुलाखतीत सलमानने सांगितलं, “जुही माझी खूप आवडती होती. तिच्याशी माझं लग्न लावून द्याल का, असं मी तिच्या वडिलांना विचारलं.” पण त्यांनी कोणास ठाऊक लग्नाला नकार दिला, असे सलमानने पुढे सांगितले. जुहीच्या वडिलांनी नकार का दिला असावा, असे तुला वाटते; असा प्रश्न सलमानला करण्यात आला. तेव्हा तो म्हणाला,”माहीत नाही. त्यांना मी योग्य वाटलो नसेन.”

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

त्यानंतर १९९५ साली जुहीने प्रख्यात उद्योजक जय मेहताशी लग्न केलं. त्यांना दोन मुले झालीत. जुहीसोबत सलमानने काही चित्रपटात कामे केली आहेत. त्यापैकी ‘अंदाज अपना अपना’ हा लोकांच्या जास्त लक्षात राहिला आहे.