मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये नाव आल्याने जॅकलिनची सल...

मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये नाव आल्याने जॅकलिनची सलमानच्या दबंग टूर मधून गच्छंती! (Salman Khan To Replace Jacqueline Fernandez From Da-Bangg Concert)

१० डिसेंबरपासून रियाधमध्ये सुरू होणाऱ्या सलमान खानच्या दबंग कॉन्सर्टमधून बहुतेक त्याची मैत्रिण जॅकलिनची गच्छन्ती होऊ शकते. सलमान खान जॅकलिनचा चांगला मित्र असला तरी जॅकलिनचे नाव मनी लाँड्रिंगमध्ये आल्यानंतर तिच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे सलमानला तिला दबंग दौऱ्यासाठी बाहेर काढावे लागू शकते. यावर सलमान विचार करत असून तिच्या जागी तो डेजी शाहला सोबत घेऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

Salman Khan, Jacqueline Fernandez, Da-Bangg Concert

महाठग सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलिनचे नाव समोर आल्यानंतर ईडी जॅकलिनला अधिक चौकशीसाठी बोलावू शकते आणि एवढेच नाही तर जॅकलिनला काल रात्री मुंबई विमानतळावरही ताब्यात घेण्यात आले होते, मात्र नंतर तिला सोडून देण्यात आले. जॅकलिनच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यामुळे तिला मुंबईबाहेर जाण्यापासून रोखले जाऊ शकते. या सर्व अडचणींमुळे सलमान खान जॅकलिनला दबंगच्या दौऱ्यावर न नेण्याच्या विचारात आहे.

Salman Khan, Jacqueline Fernandez, Da-Bangg Concert

या दौऱ्यात शिल्पा शेट्टी आणि आयुष शर्मा देखील सलमानसोबत असतील आणि जॅकलीनऐवजी डेझी शाह जाऊ शकते. २०० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात सुकेशसोबत जॅकलीनचेही नाव पुढे येत असून जॅकलीन सुकेशला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. सुकेशने जॅकलिनवर करोडो रुपये खर्च केले आणि 52 लाख किमतीचा घोडा आणि 9 लाखांची पर्शियन मांजर अशा महागड्या भेटवस्तूही दिल्या.

Salman Khan, Jacqueline Fernandez, Da-Bangg Concert

मात्र सुकेशने केलेल्या फसवणुकीशी तिचा काहीही संबंध नाही किंवा ती त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये नसल्याचे जॅकलिनने म्हटले आहे. पण काही दिवसांपूर्वी जॅकलिन आणि सुकेशचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले होते, त्यावरून दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचे दिसते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / सोशल मीडिया