सलमान खानने भाड्याचे नवे घर घेतले, पण राहण्यासा...

सलमान खानने भाड्याचे नवे घर घेतले, पण राहण्यासाठी नाही… अन्य काही कामासाठी… कोणते काम? (Salman Khan Takes New House On Rent… Not For Living… For Some Other Work?)

बॉलिवूडचा ख्यातनाम भाईजान, सलमान खान, मुंबईमध्ये वांद्रे उपनगरात गॅलॅक्सी अपार्टमेन्टमध्ये, आपल्या कुटुंबासह राहतो, हे सगळ्यांना ठाऊक आहे. शिवाय त्याचे पनवेलमध्ये मोठे फार्म हाऊस आहे. करोनाची लाट गेल्या वर्षी आली व सगळीकडे लॉकडाऊन झाला, तेव्हा सलमान कित्येक महिने पनवलेमध्ये राहिला होता.

आता एक नवीन खबर अशी मिळाली आहे की, सल्लू भाईने वांद्रे येथे आणखी एक नवे घर भाड्याने घेतले आहे. त्याचे भाडे किती आहे, ते ऐकाल तर थक्क व्हाल. शिवाय त्याने हा डुप्लेक्स फ्लॅट राहण्यासाठी नाही, तर अन्य काही कारणासाठी भाड्याने घेतला आहे… कोणते आहे ‘ते’ काम?…

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

वांद्रे उपनगरात सलमानने जो डुप्लेक्स फ्लॅट घेतला आहे, त्याचे दरमहा ८ लाख रुपये भाडे तो देणार आहे. आत्ता बोला! हा अतिशय आलिशान फ्लॅट २२६५ चौ. फुटांचा आहे. बाबा सिद्दीकी व जिशान सिद्दीकी त्याचे मालक आहेत. या भल्यामोठ्या फ्लॅटमध्ये सलमान राहणार नाही. तर त्याच्या निर्मितीसंस्थेत जे लेखक काम करतात, ते वापरणार आहेत. सलमानला सतत काम करावेसे वाटते. एकामागून एक चित्रपट त्याला करायचे आहेत. त्यांचे लेखन करणारी लेखकमंडळी इथे कामासाठी राहणार आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘टायगर ३’ या चित्रपटाचे शूटिंग सध्या चालू आहे. त्यामध्ये कतरीना कैफ, सलमानची नायिका आहे. त्यानंतर तो चिंरजीवी निर्माण करत असलेल्या ‘गॉडफादर’ या चित्रपटाचे शूटिंग करील. ‘कभी ईद कभी दिवाली’ हा त्याचा आणखी एक नवा चित्रपट येणार आहे. त्यामध्ये त्याची नायिका पूजा हेगडे असून नवीन वर्षात त्याचे शूटींग सुरू होईल.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘अंतिम : द फायनल टरूथ’ हा देखील सलमानचा नवा चित्रपट आहे. तो नोव्हेंबरात प्रदर्शित होईल. त्यामध्ये सलमान पोलीस अधिकारी आहे. अन्‌ त्याचा मेहुणा आयुष शर्मा, एका गँगस्टराच्या भूमिकेत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित एक चित्रपट नोव्हेंबरात प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हा रिमेक आहे. शिवाय सलमान, बिग बॉसच्या १५ व्या पर्वाचे सूत्रसंचालन करीत आहे. अशा अनेक प्रकल्पाच्या लेखनकार्यात, लेखकांना निवांतपणा मिळावा, या हेतूने सलमानने भाड्याचे नवे घर घेतले आहे.