सलमान खानने कोविड-१९ लशीचा पहिला डोस घेतला (Sal...

सलमान खानने कोविड-१९ लशीचा पहिला डोस घेतला (Salman Khan Takes First Dose Of Covid-19 Vaccine)

मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलात जाऊन सलमान खानने कोविड-१९ लशीचा पहिला डोस घेतला. सोशल मीडियावर स्वतः सलमाननेच हे जाहीर केले.
वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटलात सलमानने लशीचा डोस घेतला. ज्या बॉलिवूड कलाकारांनी ही लस टोचून घेतली, त्यांच्या यादीत सलमानचा समावेश झाला.

सलमानच्या आधी संजय दत्तने देखील आपला फोटो प्रसिद्ध करून लस टोचून घेतल्याचे जाहीर केले होते.
ट्वीटर हॅन्डल वरून याची माहिती देऊन सलमान म्हणतो,” आज मी कोविड -१९ चा पहिला डोस घेतला…”

ग्रे कलरचा टी शर्ट आणि ब्लॅक ट्राऊजर्स घातलेला सलमान खान हॉस्पिटलात आढळला. त्याने मास्क घातला होता, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले होते.

सलमानच्या आधी संजय दत्त, सैफ अली खान, परेश रावल, अनुपम खेर आदी कलाकारांनी ही लस टोचून घेतली आहे.

त्याच्या चाहत्यांच्या माहितीसाठी – ‘राधे, युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सलमान व्यस्त आहे. मे महिन्यात ईदच्या दिवशी तो प्रदर्शित होईल. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटात सलमान सोबत दिशा पटणी, रणदीप हुडा, जॅकी श्रॉफ, मेघा आकाश, झरिना वहाब हे कलाकार आहेत.

चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा