आईच्या मांडीवर डोकं ठेवून काढलेला सेल्फी शेअर क...

आईच्या मांडीवर डोकं ठेवून काढलेला सेल्फी शेअर करून सलमानने लिहीले, ‘आईच्या कुशीत स्वर्ग आहे.’(Salman Khan shares selfie as he lays on his mother Salma Khan’s lap, writes: ‘Maa ki godh, jannat’)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अतिशय कुटुंबवत्सल असून तो आपल्या कुटुंबियांवर जिवापाड प्रेम करतो, हे सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. सण-उत्सव साजरे करणे असो, कौटुंबिक समारंभ असो वा गेट टुगेदर… खान परिवारातील व्यक्तींमधील प्रेमळ बॉन्डिंग चाहत्यांचं मन जिंकतं. सलमान खान हा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या तुलनेत त्याची आई सलमा खान यांच्या बेहद जवळ आहे. तो अजूनही आपल्या आईला घाबरतो आणि त्यांच्यावर सर्वाधिक प्रेम करतो.

सलमान ५६ वर्षांचा झाला असूनही तो आपल्या आई-वडीलांसोबत राहतो. आजही त्याला आपल्या आईच्या हातचं जेवण जेवायला आवडतं. सलमानने अलीकडेच आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, या फोटोतून त्याचे आणि त्याच्या आईचे जिव्हाळ्याचे नाते अनुभवास येते. त्यांच्या या फोटोवर चाहतेही भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.

सलमान खानचा बिग बॉस शो काहीच दिवसांपूर्वी संपलेला आहे. लवकरच तो आपला आगामी सिनेमा ‘टाइगर ३’ चे शूटिंग सुरू करणार आहे. दरम्यान काही दिवस तो आपल्या आईसोबत घालवत आहे. त्याने इन्स्टाग्रामवर आपल्या आईसोबतचा एक गोड सेल्फी शेअर केला आहे आणि आईच्या कुशीत स्वर्ग असल्याचे म्हटले आहे.

या फोटोमध्ये सलमानने ग्रीन टी-शर्ट घातला असून आईने ब्लू रंगाचा कुर्ता घातलेला आहे. आईच्या मांडीवर डोकं ठेवून सलमानने आईसोबत हा सेल्फी काढलेला आहे. हा फोटो आणि त्याला भाईजानने दिलेली कॅप्शन पाहून खरोखर सलमान आईच्या मांडीवर स्वर्गसुखाचा आनंद घेत असल्याची जाणीव होत आहे. आणि म्हणूनच हो फोटो शेअर केल्या केल्या काहीच तासांत १९ लाखाहून अधिक चाहत्यांनी त्यास पसंती दर्शविली आहे. सेलिब्रिटींनीही या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. फोटोतील साधेपणा सगळ्यांना अधिक भावला आहे.

सलमान खानच्या कामाबद्दल सांगायचं तर तो लवकरच ‘टाइगर ३’ च्या शूटिंगसाठी रवाना होणार आहे. या सिनेमात कतरीना कैफ त्याच्यासोबत असणार आहे. तर आगामी प्रोजेक्ट ‘किक २’ आणि ‘कभी ईद कभी दीवाली’ मध्ये त्याच्यासोबत अनुक्रमे जॅकलीन फर्नांडीस आणि पुजा हेगडे दिसणार आहेत.