सलमान खान कुत्र्यांवर बेहद्द प्रेम करतो : त्यां...

सलमान खान कुत्र्यांवर बेहद्द प्रेम करतो : त्यांच्या देखभालीसाठी पाण्यासारखा पैसा वाहवतो (Salman Khan Loves His Pet Dogs, Spends Huge Amount on Them Every Month)

बॉलिवूडचा सगळ्यांचा चहेता सलमान खान आजवर अविवाहित असला तरी त्याचे स्टारडम जबरदस्त आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सर्वांचा मित्र असून सर्वत्र त्याचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. चांगला स्वभाव, व्यक्तीमत्त्व आणि अभिनय कौशल्य या त्याच्या गुणांमुळे चाहत्यांना त्याच्याबद्दल खूप प्रेम आहे. कधीही कोणाचीही मदत करण्यास सदैव तयार असणारा सलमान प्राण्यांवर जिवापाड प्रेम करतो. त्याने अनेक प्राण्यांना कायदेशीररित्या परवानगी घेऊन आपल्या फार्म हाऊसवर पाळले आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अर्थात सलमान खानने अनेक प्राणी पाळले असले तरी त्याचे कुत्र्यांवरचे प्रेम विशेष आहे. सल्लू मियाँचे त्याने पाळलेल्या कुत्र्यांशी खास बॉन्डिंग आहे. तो त्यांची घरच्या सदस्यांप्रमाणे खूप काळजी घेतो आणि त्यांच्या संगोपनावर दर महिन्याला पाण्यासारखे पैसे खर्च करतो. सलमान खानला जशी ऐषोआरामाची जीवनशैली जगायला आवडते, तशीच जीवनशैली त्याने आपल्या पाळीव कुत्र्यांनाही दिली आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

सलमान खान आपल्या पाळीव कुत्र्यांच्या पालनपोषणावर दर महिन्याला पाण्यासारखा पैसा वाहवतो. सलमानकडे मैसन आणि मैजान असे दोन कुत्रे होते, या दोघांनाही त्याने आपल्या मुलांप्रमाणे वाढवले होते, असे म्हटले जाते. सलमानला अगदी जीव की प्राण असलेले मैसन आणि मैजान दोन्ही कुत्रे आता या जगात नाहीत. २०१६ मध्ये या दोन्ही कुत्र्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू सलमानच्या मनाला चटका लावून गेला. या दोन कुत्र्यांसोबतचे सलमानचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे बिग बॉसच्या सेटवरही सलमान खान त्याच्या कुत्र्यांसोबत स्पॉट झाला आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

दोन्ही कुत्र्यांच्या मृत्यूनंतर आता सलमान खानकडे मैलाव, सेंट आणि मोगली नावाचे कुत्रे आहेत. सलमानचे या कुत्र्यांवरही खूप प्रेम आहे आणि दर महिन्याला तो त्यांच्या देखभालीकरीता पाण्यासारखे पैसे खर्च करतो. या कुत्र्यांचे खाणे, राहणे, ते लसीकरण यांसारख्या अत्यावश्यक गोष्टींवर सलमान दर महिन्याला लाखो रुपये खर्च करतो, हे सर्व पाहता त्याच्याकडील कुत्र्यांचा कोणालाही हेवा वाटावा नाही काय?