वारंवार सेल्फी काढणाऱ्या चाहत्यावर सलमान खान भड...

वारंवार सेल्फी काढणाऱ्या चाहत्यावर सलमान खान भडकला… अपशब्द बोलला… (Salman Khan Lost Control On A Fan, Who Was Crazy For Selfie)

फिल्मी सिताऱ्यांवर त्यांचे चाहते अलोट प्रेम करतात. तशातच आपला आवडता सितारा अचानक समोर आला, तर ते इतके उत्तेजित होतात की, काहीबाही करून बसतात. अन्‌ कलाकाराची नाराजी ओढवून घेतात.

असाच प्रकार सलमान खानच्या बाबतीत घडला. त्याचा एक चाहता वारंवार सेल्फी काढू लागला. तेव्हा सलमान भडकला. त्यानं रागाच्या भरात चाहत्याचा अपमान केला…

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

एका समारंभात भाईजान सलमान, फोटोग्राफर्सना पोजेस्‌ देत होता. त्यांच्यामध्ये एक चाहता घुसला व सलमान सोबत त्याने सेल्फी काढला. तेव्हा त्याला तिथून हटवला. तर हटवादीपणे तो पुन्हा आला आणि सेल्फी काढू लागला. पुन्हा त्याला हटवला, तर त्याने पुन्हा तोच प्रकार केला. तेव्हा मात्र सलमानच्या रागाचा पारा चढला. अन्‌ तो म्हणाला – ‘नाचना बंद कर.’

या घटनेचा व्हिडिओ विरल भयानीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला. ज्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सलमान खानच्या कामकाजाबद्दल बोलायचं तर ‘अंतिम : द फायनल ट्‌रुथ’ या येऊ घातलेल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो बिझी आहे. शिवाय ‘किक २’, ‘टायगर ३’, ‘कभी ईद कभी दिवाली’ असे त्याचे चित्रपट पुढील वर्षी येतील. आत्ताच्या क्षणी तो ‘बिग बॉस’चा सूत्रधार म्हणून लोकांना दररोज दर्शन देत आहेच.