शाहरूखच्या आधी सलमानला ‘मन्नत’ बंगल्याची ऑफर आल...

शाहरूखच्या आधी सलमानला ‘मन्नत’ बंगल्याची ऑफर आली होती (Salman Khan Had Received The Offer For Mannat Bungalow, Which Now Belongs To Shahrukh Khan )

बॉलिवूडमध्ये बहुतांश कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातल्या घराचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकरांचे आलिशान बंगले आहेत. मुंबईत कलाकारांच्या बंगल्यांच्या आसपास चाहत्यांची घुटमळ सुरु असते.

अमिताभ बच्चन यांचा जलसा किंवा सलमान खानचा गॅलेक्सी , शाहरुख खानचा मन्नत हे अलिशान बंगले तर आता प्रेक्षणीय स्थळ म्हणून सुद्धा पाहिली जातात. पण तुम्हाला माहित आहे का की, मन्नत या बंगल्याच्या खरेदची ऑफर शाहरुखच्या आधी सलमानला विचारण्यात आली होती.

हो हे खरे आहे. एका मुलाखतीत सलमानला पत्रकाराने विचारले होते की, अशी कोणती गोष्ट आहे जी शाहरुखकडे आहे पण ती तुला मिळावी अशी तुझी इच्छा होती. तेव्हा सलमानने पटकन त्याचा बंगला असे उत्तर दिले. यापुढे सलमान म्हणाला की, हे फार कमी लोकांना माहित आहे. जेव्हा मन्नत विकायला काढलेला तेव्हा शाहरुख आधी मला विचारण्यात आले होते. त्यावेळी आमची सुद्धा चांगली परिस्थिती होती.

त्यामुळे मी माझ्या वडीलांना म्हणजे चित्रपट निर्माते सलीम खान यांना मन्नत विकत घेण्याबद्दल सांगितले. पण त्यावेळी माझे वडील इतकं मोठं घर घेऊन तू करणार काय त्यापेक्षा नको असे म्हणाले होते. त्यामुळे मी मन्नत विकत घेतला नाही. पुढे गौरीच्या इच्छेखातर शाहरुखने तो बंगला विकत घेतला. पण आता मला शाहरुखला तो प्रश्न विचारावासा वाटतो की, इतक्या मोठ्या बंगल्यात तू करतोस काय ?