सलमान खान वर ३ कोटीची अफरातफर केल्याचा आरोप : ब...

सलमान खान वर ३ कोटीची अफरातफर केल्याचा आरोप : बहीण अलविरा व बिईंग ह्युमनच्या अधिकाऱ्यांना बजावले समन्स (Salman Khan Embroiled In Rs 3 Crore Fraud Case, Summon Against Sister Alvira And Being Human Officials Too)

सलमान खान आणि त्याची बहीण अलवीरा यांच्याविरूध्द चंदिगढच्या एका व्यापाऱ्याने अफरातफरीचा आरोप लावला आहे. हा आरोप सलमानची मालकी असलेल्या बिईंग ह्युमन या कंपनीवर लावण्यात आला आहे. त्यावरून स्वतः सलमान, त्याची बहीण अलवीरा व कंपनीचे अधिकारी यांना समन्स बजावण्यात आले आहे.

अरुण गुप्ता नावाच्या चंदिगढ येथील एका व्यापाऱ्याने ही तक्रार गुदरली असून त्यानुसार या लोकांनी ३ कोटी रुपये किंमतीची शो रुम उघडायला लावली. सलमानच्या या कंपनीशी केलेले करारपत्र त्यांच्याकडे आहे. तरीपण सलमानने धोका दिला आहे. शो रूम उघडली तरी कंपनीने त्यामध्ये विक्री करण्यासाठी सामग्री पाठविली नाही. त्याचप्रमाणे कंपनीची वेबसाईट बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. गुप्तांनी या बाबत कंपनीकडे तक्रार केली, पण त्यांनी त्याची काहीच दखल घेतली नाही.

या गुप्ताजींनी पोलिसांना सलमानचा बिग बॉस कार्यक्रमातील एक व्हिडिओ पुराव्यादाखल दिला आहे. आपण चंदिगढ येथे बिईंग ह्युमन ज्वेलरीचे शो रुम उघडले आहे, असं त्यामध्ये सलमानने सांगितले आहे. सलमान सोबत त्यांनी आपला फॅमिली फोटो दिला आहे. सलमानच्या भरवशावर आपण एवढी मोठी गुंतवणूक केली, असं अरुण गुप्ता यांचं म्हणणं आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे शो रूम २०१८ साली उघडण्यात आलं. त्यासाठी सलमान जाणार होता. पण आपण कामात असल्याने त्याने आपले मेहुणे आयुष शर्मा यांना उद्‌घाटनासाठी पाठवलं. त्यानंतर मात्र कंपनीने गुप्ता यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यांनी ज्वेलरी पाठवलीच नाही.