फार्महाऊसवर सलमानच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेश...
फार्महाऊसवर सलमानच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन (Salman Khan Celebrated His Birthday With Family And Friends)

आज (२७ डिसेंबर) अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) वाढदिवस आहे. रात्री उशिरा त्याने पनवेल येथील त्यांच्या फार्म हाऊसवर कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत ५६ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अनेक सेलिब्रिटी देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.
रविवारी सलमान खानला साप चावला होता, त्यानंतर यावेळेस तो वाढदिवस साजरा करणार नाही अशी प्रतिक्रिया समोर येत होत्या. मात्र त्याची प्रकृती सुधारत आहे. यानंतर सलमान खान स्वतः माध्यमांसमोर आला होता. त्याच्या फार्महाऊसबाहेर अनेक फोटोग्राफर्सची गर्दी जमली होती. सलमानने फार्महाऊस बाहेर येऊन आपल्या चाहत्यांना भेट दिली.

सलमानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे वडील सलीम खान, आई, बहिण, भाऊ आणि मेहुणा आयुष शर्मा असे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. सगळ्यांनी केक कापत, गाणी म्हणत, मजामस्ती करत वाढदिवस साजरा केला. गंमत म्हणजे सलमानचा भाचा आहिलने देखील सलमान मामासोबत त्याचा वाढदिवस साजरा केला. सलमानची बहिण अर्पिता आणि आयुष शर्माचा मुलगा आहिल दोन वर्षांपूर्वी याच दिवशी जन्माला आला होता. त्यामुळे त्याने मामासोबत वाढदिवसाचा केक कापला.

बिग बॉसच्या सेटवर देखील आलिया भट्ट आणि आरआरआर चित्रपटाच्या टीमसोबत सलमानने केक कापून वाढदिवस साजरा केला होता.


सलमानच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हा दिवस त्याच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा यावा यासाठी सर्व सदिच्छा देत आहेत.
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम