सलमान आणि शाहरुख खान या जोडीने कमाल केलेले चित्...

सलमान आणि शाहरुख खान या जोडीने कमाल केलेले चित्रपट (Salman Khan And Shahrukh Khan’s Duo Seen in These Bollywood Films)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि भाईजान सलमान खान या जोडीस अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिलं आहे आणि पसंतही केलं आहे. काही वर्षानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना या जोडीस एकत्र पाहता येणार आहे. लवकरच शाहरुख खानच्या आगामी ‘पठान’ चित्रपटामध्ये भाईजानची पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लागणार आहे. चित्रपटामध्ये सलमानच्या एंट्रीसाठी स्पेशल हेलीकॉप्टरचा सीन चित्रित केला गेला असल्याचे बोलले जात आहे. खरोखर आपल्या दोन्ही आवडत्या अभिनेत्यांना बरेच वर्षांनंतर एकत्र पाहणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शाहरुख आणि सलमान या जोडीने कमाल केलेल्या काही चित्रपटांबद्दल आपण बोलूया.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

१. करण अर्जुन

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये ‘करण-अर्जुन’ या चित्रपटाचा उल्लेख न झाला तरच नवल. या चित्रपटात शाहरुख आणि सलमान यांच्या जोडीस प्रेक्षकांनी खूपच पसंत केले होते. या चित्रपटातील दोन्ही कलाकारांची केमिस्ट्री आणि दमदार अभिनयाचे दर्शकांनी भरपूर कौतुक केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती.

२. कुछ कुछ होता है

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

‘कुछ-कुछ होता है’ या चित्रपटाच्या यशाबद्दल बोलण्याची काही गरजच नाही. बॉलिवूडच्या या सुपरहिट चित्रपटात शाहरुख आणि सलमानची जोडी पाहावयास मिळाली होती. या चित्रपटात सलमानची भूमिका लहान असली तरी कमाल करणारी ठरली. प्रेक्षकांसाठी दोन्ही स्टार्सना स्क्रीन वर पाहण्याचा आनंद काही औरच होता.

३. हम तुम्हारे हैं सनम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

सलमान आणि शाहरुख खान या जोडीने ‘हम तुम्हारे हैं सनम’ या चित्रपटातून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. या चित्रपटात माधुरी दीक्षितने मुख्य भूमिका साकारली होती. एकदंरच या  चित्रपटामध्ये तिन्ही कलाकारांनी आपल्या बेस्ट अभिनयाचा प्रत्यय आणून दिला होता आणि पुन्हा एकदा शाहरुख व सलमान जोडीने प्रेक्षकांचं हृदय जिंकलं होतं.  

४. हर दिल जो प्यार करेगा

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

चित्रपट ‘हर दिल जो प्यार करेगा’ मध्ये सलमान खान सोबत प्रीति झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या आणि शाहरुख खान सहकलाकार म्हणून दिसला होता. या चित्रपटात शाहरुखचा रोल लहान असला तरी शाहरुख – सलमान जोडीला स्क्रीनवर एकत्र पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा या चित्रपटामुळे पूर्ण झाली होती.

५. ओम शांति ओम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला चित्रपट ‘ओम शांति ओम’ मध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. परंतु या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकमध्ये सलमान खानही दिसला होता. शीर्षक गीतावर नाच करताना शाहरुख सोबत सलमानला पाहून चाहते बेहद खूश झाले होते.

६. ट्यूबलाइट

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

सलमान खान अभिनीत ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाने खास कमाल दाखवली नसली, तरी या चित्रपटामध्ये सल्लू मियाँसोबत किंग खानची जोडी प्रेक्षकांना पाहवयास मिळाली होती. या चित्रपटामध्ये शाहरुखने मॅजिशियन गोगो पाशाचं पात्र साकारलं होतं आणि प्रेक्षकांनी या जोडीची धमाल एन्जॉय केली होती.

७. झिरो

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

बॉलिवूडच्या सर्वाधिक महागड्या चित्रपटामध्ये ‘झिरो’ ची वर्णी लागते. या चित्रपटात शाहरुखने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. परंतु सलमान खानही या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातील इश्कबाजी या गाण्यामध्ये शाहरुख आणि सलमान यांचा एकत्र जलवा चाहत्यांना पाहवयास मिळाला होता.