‘तुमची गत पण मूसेवाला सारखीच करू….....

‘तुमची गत पण मूसेवाला सारखीच करू…..’सलमान आणि त्याचे पिताजी सलीम खान यांना जिवे मारण्याची धमकी (Salman Khan And His Father Salim Khan Get Threat Letter, FIR Registered)

काही दिवसांपूर्वी पंजाबी गायक सिध्दू मूसेवालाची दिवसाढवळ्या 25-30 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे सध्या सगळीकडे भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आता बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) सुद्धा जीवे मारण्याची धमक्या येत आहे. सलमानचे वडिल सलीम खान सकाळी जॉगिंगसाठी गेले असताना  बाहेर बाकड्यावर त्यांना एक पत्र मिळाले. त्यात सलमान खान आणि सलीम खानला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
पत्रात लिहिलेले, ”तुमची गत पण मूसेवाला सारखीच करू…..”

या घटनेनंतर अज्ञात इसमाविरोधात वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी हे प्रकरण खूपच गांभीर्याने घेतले असून त्यांचा या प्रकरणी लॉरेंस बिश्नोई गॅंगवर संशय आहे, कारण यापूर्वी 2018 मध्ये या गॅंगने सलमानचा जीव घेण्याची धमकी दिली होती. 1998 मध्ये जेव्हा काळवीट शिकार प्रकरणात सलमानचे नाव आलेले तेव्हापासूनच लॉरेंस बिश्नोई सलमानवर डुक धरून होता. त्याने सलमानला जोधपूर कोर्टाबाहेर मारण्याची धमकीही दिली होती.

लॉरेंस बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहाड जेलमध्ये कैद आहे. सिद्धू मूसेवालाच्या बाबतीतही त्याची विचारपूस चालू आहे. सलमानच्या बाबतीत पोलिसांना कोणताच हलगर्जीपणा करायचा नाही. त्यामुळे त्यांनी सलमानची सुरक्षा वाढवली आहे. काही दिवसांपुर्वी सलमान आयफा अवॉर्डसाठी अबू धाबीला गेला होता. तिथून तो आता परतला आहे.
यापूर्वी लॉरेन्सने 2020 मध्ये त्याच्या एका शार्प शूटरकडून सलमानला मारण्याची योजना आखली होती. त्यासाठी त्याने सलमानच्या घराची रेकीसुद्धा केली होती.

सलमानच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा टायगर 3 हा चित्रपट पाइपलाइनमध्ये आहे. त्यात त्याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ असल्यामुळे सगळेच त्या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. याव्यतिरिक्त तो कभी ईद कभी दीवाली या चित्रपटाचे शूट करत आहे. या चित्रपटातून बिग बॉस फेम शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या व्यतिरिक्त अभिनेत्री पूजा हेगडेसुद्धा यात दिसणार आहे. पण हा चित्रपट सुरु होण्यापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून त्यातले कलाकार रिप्लेस केले जात आहेत.