सलमान खानला साप चावला : रात्री ३ वाजता हॉस्पिटल...
सलमान खानला साप चावला : रात्री ३ वाजता हॉस्पिटलात दाखल केले (Salman Khan Admitted To Hospital At 3 AM, Details Inside)

By Deepak Khedekar in मनोरंजन
सलमान खान (Salman Khan) ख्रिसमसची पार्टी एन्जॉय करण्यासाठी आपल्या पनवेल येथील फार्म हाऊसवर गेला असता, तिथे दुर्घटना घडली. सलमान खानला साप चावला आणि त्याला नवी मुंबई क्षेत्रातील कामोठे गावातील महात्मा गांधी मिशन हॉस्पिटलात भरती करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार करून जवळपास ७ तास देखरेख ठेवण्यात आली. नंतर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सलमान आपल्या फार्म हाऊसवर परतला आहे.

सलमानला चावलेला साप विषारी नव्हता, त्यामुळे त्याला कोणताही धोका नसल्याची बातमी आली आहे. उद्या २७ डिसेंबरला सलमानचा वाढदिवस आहे. त्याआधी ही विचित्र घटना घडल्याने वाढदिवस साजरा होईल की नाही, याची शंका आहे. सलमान सध्या फार्म हाऊसवर आराम करतो आहे.
