या व्यक्तीच्या सल्ल्यामुळे करीना आणि सैफने बदलल...

या व्यक्तीच्या सल्ल्यामुळे करीना आणि सैफने बदलली होती आपली नो किसिंग सीन पॉलिसी (Saif-Kareena did not Want to do Kissing Scene on Screen After Marriage, Changed Their Decision Because of This Person)

बॉलिवूडमध्ये झिरो फिगरचा ट्रेंड आणणारी अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची प्रेमकहाणी सर्वांनाच माहित आहे. सैफ-करीनाला बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक मानले जाते. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. त्यावेळी या दोघांनी ठरवले होते की लग्नानंतर पडद्यावर कधीही किसिंग सीन करणार नाहीत. पण एका व्यक्तीमुळे त्यांना आपला निर्णय बदलावा लागला.

लग्नानंतर सैफ आणि करीनाने आपल्या फिल्मी करीअरबाबत एक मोठा निर्णय घेतला होता. दोघेही पडद्यावर कधीही किसिंग सीन करणार नाहीत असे त्यांनी ठरवले होते, पण नंतर एका व्यक्तीच्या सांगण्यावरून दोघांनीही आपला निर्णय बदलला.ती व्यक्ती म्हणजे सैफची लाडकी लेक सारा अली खान.

सारा भलेही सैफ आणि अमृता सिंहची मुलगी असली तरी तिचे तिच्या सावत्र आईसोबत चांगले जमते. अनेकदा ती करीनासोबत चांगला वेळ सुद्धा घालवते. साराच्या सांगण्यावरुन सैफ आणि करीनाने आपला लग्नानंतर किसिंग सीन न करण्याचा निर्णय बदलला होता.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी एकदा सारा अली खानसोबत त्यांच्या नो किसिंग पॉलिसीबद्दल चर्चा केली. त्यावेळी त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर साराने त्यांना अशी कोणतीही पॉलिसी करण्याची गरज नाही, असा सल्ला दिला. आजची पिढी चुंबन घेणे वगैरे चुकीचे मानत नाही. त्यामुळे तुम्ही असा निर्णय घेऊन करीअरमध्ये अडथळे निर्माण करण्याची गरज नाही, असे सारा म्हणाली होती.

सारा अली खानशी बोलल्यानंतर सैफ आणि करीनाला तिचे म्हणणे पटले. आणि त्यांनी आपला निर्णय बदलला. सैफ अली खान आणि त्याची एक्स पत्नी अमृता सिंह यांचा लग्नाच्या १३ वर्षानंतर घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर सारा आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान यांची कस्टडी अमृता सिंगकडे आहे.

सैफ आणि करीनाच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचे झाल्यास टशन चित्रपटादरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढू लागली होती. काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. करीनासोबतच्या दुसऱ्या लग्नानंतर सैफला तैमूर अली खान आणि जेह अली खानही दोन मुले झाली.