चालण्याच्या स्टाइलमुळे सैफ अली खान झाला ट्रोल, ...

चालण्याच्या स्टाइलमुळे सैफ अली खान झाला ट्रोल, युजर्स म्हणाले मलायकासारखा का चालतोस..(Saif Ali Khan Gets Trolled For His Walking Style, Netizens Says, “Malaika Ki Chaal Chal Raha Hai”)

चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा सैफ अली खान नुकताच डबिंग स्टुडिओबाहेर दिसला. त्यावेळची अभिनेत्याची विचित्र चाल पाहून नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही नेटकऱ्यांनी तर सैफच्या चालीची मलायकाच्या डक वॉकशी तुलना करायला सुरुवात केली.

मलायका अरोरा तिच्या डक मूव्हसाठी खूप लोकप्रिय आहे. जेव्हा-जेव्हा अभिनेत्रीला जिमच्या बाहेर पाहिले जाते तेव्हा ती तशीच फिरते. अलीकडेच सैफ अली खान मुंबईतील एका डबिंग स्टुडिओबाहेर दिसला. सैफ स्टुडिओबाहेर वेगळ्याच पद्धतीने फिरत होता. मग नेटिझन्सना अभिनेत्याला ट्रोल करण्याची संधीच मिळाली

पापाराझी अकाउंटवरून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सैफ अली खान कारमधून उतरून डबिंग स्टुडिओकडे जाताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सैफ वेगळ्याच अंदाजात फिरत आहे. त्याची चालण्याची पद्धत पाहून सोशल मीडिया युजर्स त्याला ट्रोल करत आहेत. कमेंट बॉक्समध्ये एका युजरने मलायकाची चाल चालत आहे असे लिहिले. तर दुसर्‍या युजरने मलायका नंबर 2 ब्लडी अॅटिट्यूड अंकल असे लिहिले.

सैफ अली खानच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे तर, सैफ शेवटचा ऋतिक रोशनसोबत विक्रम वेधा या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.