सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली...

सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली खान करणार चित्रपटात पदार्पण, करण जोहर देणार संधी (Saif Ali Khan And Amrita Singh’s Son, Ibrahim Ali Khan Is All Set To Make His Bollywood Debut With Karan Johar’s Film, Deets Inside)

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या हॉट लूकमुळे चर्चेत आहे.  अरमान मलिकच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये पापाराझींसमोर अरमान याने इब्राहिमला आगामी सुपरस्टार असे म्हटले होते.

मिळालेल्या माहितीनुसार सैफ-अमृताचा मुलगा इब्राहिम लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून त्याला करण जोहर संधी देणार आहे.

करण अनेकदा केवळ स्टार किड्स लॉन्च करतो म्हणून त्याला ट्रोल देखील केले जाते, पण करणला त्याची पर्वा नसते. आता तो इब्राहिम अली खानला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट संरक्षण दलावर आधारित असून २०२३ मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे.

धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन बोमन इराणी यांचा मुलगा कयोज करणार आहे. याशिवाय इब्राहिम करणला त्याच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटासाठी असिस्ट करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट्ट, शबाना आझमी, जया बच्चन आणि धर्मेंद्र हे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. एप्रिल 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

इब्राहिमची बहीण साराने 2018 मध्ये केदारनाथ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, या चित्रपटात  सुशांत सिंग राजपूत तिचा सहकलाकार होता.