सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी या...

सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी या स्टार्सचा फिल्मफेअर सोहळ्यात फॅशनचा नखरा (Sai Tamhankar, Amruta Khanvilkar, Sanali Kulkarni And Other Stars Shine With Glamorous Fashion In Marathi Filmfare Award Function)

नेहमीच्या थाटात ‘फिल्मफेअर ॲवॉर्डस्‌ मराठी २०२१’ हा पुरस्कार सोहळा, वांद्रे येथील सभागृहात पार पडला. प्लॅनेट मराठी प्रस्तुत या सोहळ्यात मराठी चित्रसृष्टीतील पुरस्कार देण्यात आले. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून झिम्मा आणि कारखानीसांची वारी यांना विभागून तर सई ताम्हणकर (धुरळा) व नेहा पेंडसे (जून) या अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून देण्यात आला.

‘धुरळा’ या चित्रपटास सर्वात जास्त म्हणजे ७ पुरस्कार मिळाले. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदी व मराठी चित्रसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. ९३ वर्षांच्या असलेल्या दीदींना निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सन्मानित केले.

या सोहळ्याचे आकर्षण ठरले ते मराठी अभिनेत्रींचा रेड कार्पेटवर दिमाखदार वावर. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, रुपाली भोसले, प्रिया बापट या आघाडीच्या तारकांनी फॅशनचा नखरा पेश केला.