सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अडीच वर्षांनी...
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अडीच वर्षांनी त्याचा पाळीव कुत्रा फजचे निधन (Sad Demise! Sushant Singh Rajput’s Pet Dog Fudge Dies, Actor’s Sister Shares Unseen Pictures With A Heartfelt Note)

सुशांत सिंग राजपूतच्या अकाली जाण्याचे दु:ख चाहते आणि त्याचे कुटुंबीय पचवू शकले नाहीत त्यात आता आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर सुमारे अडीच वर्षांनंतर त्याचा लाडका पाळीव कुत्रा फज याचेही निधन झाले आहे.
सुशांत सिंहची बहीण प्रियांकाने फजच्या मृत्यूची बातमी ट्विटरवर शेअर केली. प्रियांकाने सुशांतसोबत फजचे दोन फोटो शेअर केले आणि लिहिले की, शेवटी तू स्वर्गात तुझ्या मित्रासोबत सामील झाला आहेस. आम्हीही लवकरच तुमच्या मागे येऊ… तोपर्यंत वेदना होतच राहतील.
सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू 14 जून 2020 रोजी झाला. तो त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला. सुरुवातीच्या काळात सुशांतचा मृत्यूचे कारण आत्महत्या असे वर्णन करण्यात आले होते पण नंतर कुटुंबीयांनी याला षडयंत्र म्हटले. तपास झाला, ड्रग्ज कनेक्शन आणि रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतरही या प्रकरणात फारसे यश आले नाही.
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा पाळीव कुत्रा फज खूप निराश आणि दुःखी होता. सुशांतचे वडील त्याला सोबत घेऊन बिहारला गेले. त्यावेळी अभिनेत्यासोबतचे फजचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यातील एका फोटोने सर्वांनाच भावूक केले होते.
So long Fudge! You joined your friend’s Heavenly territory… will follow soon! Till then… so heart broken 💔 pic.twitter.com/gtwqLoELYV
— Priyanka Singh (@withoutthemind) January 16, 2023
सुशांतच्या फोटोजवळ फज उदासपणे बसलेला दिसला. फज सुशांतच्या खूप जवळचा होता. सुशांत प्राणी-पक्षी प्रेमी होता. आता सुशांतच्या मृत्यूनंतर अडीच वर्षांनी फजच्या निधनाची ही दुःखद बातमीही समोर आली आहे.
ही बातमी येताच चाहतेही भावूक झाले आणि सुशांतसोबत फजचे जुने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता सुशांतसोबत फजही स्वर्गात असल्याचे चाहते म्हणत आहेत.