सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण, सध्या होम क्वारं...

सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण, सध्या होम क्वारंटाइन (Sachin Tendulkar Tests Positive For Covid-19, Currently In ‘Home Quarantine’)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाचा संसर्ग झाला. सचिनने स्वतः याविषयी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तो सध्या होम क्वारंटाइन आहे आणि त्याची प्रकृती चांगली आहे.
सचिनने सांगितले की,” मी सलग माझी टेस्ट करुन घेत होतो आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व काळजी घेत होतो. तरीही मी कोरोनाच्या विळख्यात सापडलो आहे. मी डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. मला सौम्य लक्षणे आढळली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी. असे आवाहन सचिनने केले आहे.”
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. देशातील अनेक दिग्गजांनाही कोरोनाने विळखा घातला आहे.

पुरुषांच्या इंद्रियावर कमेंट करून दिया मिर्झाने माजवली खळबळ… (Dia Mirza’s Comment On Mens Private Part; People Surprised By Tweet)