सचिन तेंडुलकर हॉस्पिटलात (Sachin Tendulkar Hosp...

सचिन तेंडुलकर हॉस्पिटलात (Sachin Tendulkar Hospitalised)

मास्टर ब्लास्टर म्हणून जगभरात, ख्याती पावलेला सचिन तेंडुलकर हॉस्पिटलात दाखल झाला आहे. या संदर्भात खुद्द सचिननेच माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली आहे.
सचिनला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती आणि तो घरातच विलगीकरणात होता. परंतु त्याच्या तब्येतीत चढउतार दिसून आल्यामुळे त्याला हॉस्पिटलात दाखल होण्याची वेळ आली असावी.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

तिथून सचिनने जे ट्‌विट केले त्यात तो म्हणतो, ”लोकांनी केलेल्या प्रार्थना व दिलेल्या शुभेच्छा याबद्दल धन्यवाद. वैद्यकीय सल्ल्यानुसार मी इथे दाखल झालो आहे. बरा होऊन लवकरच घरी परतेन. आपापली काळजी घ्या व सुखरूप राहा. विश्व चषकाच्या विजेतेपदाच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने माझ्या टीममधील सहकाऱ्यांना शुभेच्छा.”