सोशल मीडियावर या अभिनेत्रींच्या गरोदरपणाची अफवा...

सोशल मीडियावर या अभिनेत्रींच्या गरोदरपणाची अफवा पसरल्यामुळे त्यांना करण्यात आले होते ट्रोल (Rumors Of Pregnancy Of These Actresses Went Viral, Trolled On Social Media)

2022 मध्ये अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली होती. तर आलिया भट्ट, सोनम कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्या घरांमध्ये छोट्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. काही अभिनेत्रींच्या ओव्हर साईज ड्रेसमुळे त्या गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या. तर दुसरीकडे, अनेकांना इतर कारणांमुळेही प्रचंड ट्रोल व्हावे लागले. चला जाणून घेऊया त्या बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल.

कतरीना कैफ

 कतरीना कैफने विकी कौशल आणि कुटुंबासोबतचे ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. फोटोंमध्ये कतरीना कुटुंबातील सदस्यांच्या मागे लपलेली दिसली. त्यामुळे ती गरोदर असल्याचा अंदाज लोकांनी लावला होता. तिचे अनेक चाहते तिला सतत तू प्रेग्नंट आहेस का? असे विचारत होते. याआधीही लोकांमध्ये कतरीना प्रेग्नंट असल्याची अफवा पसरली होती. पण ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सिद्ध झाले.

मलायका अरोरा

 अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका आता अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ती अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असते. मलायका गरोदर असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच पसरली होती. यानंतर मलायका आणि अर्जुन या दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्टद्वारे संताप व्यक्त केला होता.

दीपिका पादुकोण

 बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेल्या दीपिका पादुकोणच्या बाबतीतही या खोट्या अफवा पसरल्या होत्या. तिच्या गरोदरपणाबद्दलच्या अफवा बऱ्याचदा पसरल्या आहेत. दीपिकाने मात्र या अफवांवर कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

करीना कपूर खान

 काही महिन्यांपूर्वीच दोन मुलांची आई असलेल्या करीना कपूर खानबद्दल ती पुन्हा गरोदर असल्याची अफवाही पसरली होती. मात्र, नंतर ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सिद्ध झाले. याबाबत तिने स्वत: पोस्ट शेअर केली होती.

ऐश्वर्या राय

2022 मध्ये ऐश्वर्या बऱ्याचदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसली. तिने त्यावेळी बरेचगा सैलसर कपडे परिधान करुन हजेरी लावली होती. तिच्या सैल कपड्यांमुळे ती पुन्हा एकदा आई होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.